Prisoners will receive natural remedies in jail 
कोकण

कैद्यांना मिळणार पॅरोलचा बोनस ; शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

- राजेश शेळके

रत्नागिरी: कोरोना (covid 19) महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनेचा भाग म्हणून कारागृहातील पक्क्या कैद्यांना पॅरोलवर (संचित रजा) सोडण्याचा निर्णय(parole bonus) झाला. त्या अनुषंगाने येथील विशेष कारागृहातील गंभीर गुन्ह्याखाली शिक्षा भोगणाऱ्या ८ कैद्यांना ४५ दिवसाच्या पॅरोलवर सोडण्यात आले. त्यामध्ये एका महिलेचा समावेश आहे; मात्र कोरोना महामारीचा संसर्ग अजूनही कायम असल्याने या आठ कैद्यांना टप्प्या-टप्प्याने ३० दिवसांच्या जादा संचित रजेंचा बोनस मिळाला आहे. कारागृह व्यवस्थापनाने याला दुजोरा दिला. ( prisoner-parole-bonus-covid-19-impact-government-decision-ratnagiri-news- akb84)

गेल्या वर्षी मार्चमध्ये कोरोना महामारी सुरू झाली आणि झपाट्याने संसर्ग वाढत गेला. संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासन आणि शासनाने अनेक प्रयत्न केले. काही महत्त्वाचे निर्णय घेतले तरी शहर आणि ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढतच गेला. या विषाणूने कारागृहदेखील सोडली नाही. हळुहळू या विषाणूचा कारागृहांमध्ये शिरकाव झाला. कारागृहातील बॅरेकमध्ये अनेक कैदी असल्याने संसर्ग झपाट्याने वाढू लागला. अखेर शासनाने आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत पक्क्या कैद्यांना ४५ दिवसाच्या पॅरोलवर (संचित रजा) सोडण्याचा निर्णय घेतला.

रत्नागिरी विशेष कारागृहातीतल ८ कैद्यांचा यामध्ये सामावेश आहे. या कैद्यांना ४५ दिवसाची रजा देण्यात आली होती; मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव अजून कायम आहे. त्यामुळे शासनाने आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत कैद्यांना ३० दिवसांची वाढीव रजा मंजूर केली. टप्प्या-टप्प्याने आपत्ती निवारण कायद्यामध्ये शिथिलता येत नाही तोवर ही रजा द्यावी लागणार आहे.आठ कैद्यांपैकी एकानेही कैद्याने संचित रजा नाकारली नाही. सर्वांनी त्याचा फायदा घेतला आहे. कैद्यांना कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी कारागृह प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. कोरोनाचे शासनाचे घालून दिलेले सर्व नियम काटेकोर पाळले जात आहेत. कारागृहात संसर्ग होणार याची याची पूर्ण खबरदारी घेतली जात आहे.

* पॅरोलला एकाचाही नकार नाही

* कारागृहात १५० कैदी

* कोरोना चाचणी अनिवार्य

कोरोना महामारीमध्ये शासनाच्या आपत्ती निवारण कायद्याअंतर्गत ८ कैद्यांना ४५ दिवसाच्या पॅरोलवर सोडण्यात आले; मात्र संसर्ग अजून कायम असल्याने त्यांच्या रजेमध्ये टप्प्या-टप्प्याने ३० दिवसाची वाढ करण्यात आली आहे. शासनाच्या पुढील आदेशानंतर यामध्ये बदल होईल. कोरोनाच्या सर्व नियमांची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे.

अमेय पोतदार,तुरूंग अधिकारी, रत्नागिरी विशेष कारागृह

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

Vastu Tips: घरात क्रिस्टल पिरामिड ठेवल्यावर काय होते? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या योग्य दिशा, फायदे अन् महत्त्वाचे नियम...

FDA Watch : प्रसादवाटप करणाऱ्या मंडळांना ‘एफडीए’ची नोंदणी बंधनकारक; प्रसादावर ‘एफडीए’ची नजर

SCROLL FOR NEXT