production of home made oil production with wood machine in ratnagiri
production of home made oil production with wood machine in ratnagiri 
कोकण

‘शुद्ध खा, तंदुरुस्त राहा’ ; पारंपरिक खाद्यसंस्कृती जोपासण्यासाठी कोकणातील तरुणाचा अनोखा पुढाकार

संदेश सप्रे

देवरूख (रत्नागिरी) : आपले आरोग्य निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारातील मीठ, तेल, साखर या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पूर्वीचे लोक हे आपल्या दैनंदिन आहारात लाकडी घाण्याचे तेल, गुळाचा चहा अशा शुद्ध घटकांचा अवलंब करत असत. काहीजण चार पैसे वाचवण्याच्या नादात भेसळयुक्‍त पदार्थांचे आपल्या दैनंदिन आहारात सेवन करत स्वतःचे शारीरिक स्वास्थ्य बिघडवत आहेत. ही बाब ओळखून पाटगाव येथील अवधूत मेस्त्री यांनी नव्या उद्योगाची निर्मिती केली आहे. 

भेसळयुक्‍त खाद्यसंस्कृतीच्या आहारी जाणाऱ्यांसाठी ‘शुद्ध खा आणि तंदुरुस्त राहा’ हा मूलमंत्र देत संगमेश्‍वर तालुक्‍यातील पाटगाव येथील अवधूत विलास मेस्त्री यांनी लाकडी घाण्यापासून शुद्ध तेलनिर्मिती उद्योग सुरू करत पारंपरिक खाद्यसंस्कृती जोपासण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या या उद्योगाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

मेस्त्री यांनी, माया पोषक लाकडी घाण्यापासून शुद्ध शेंगदाणा तेल, खोबरेल तेल, करडई, तीळ, मोहरी, जवस (आळशी), बदाम आदी तेलांसह जीवन अमृत तेल, केश अमृत व मसाज तेलाची निर्मिती केली आहे. त्याचबरोबर सेंद्रीय गूळ, सैंधव मीठ यांसह लसूण चटणी, मेथकुट, कुळीथ पीठ व डांगर पीठ, हळद पावडर अशी शुद्ध घरगुती उत्पादनेही विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. पाटगाव येथील निवासस्थानी त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. 

मुंबई, साताऱ्यात विक्री

रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, मुंबई, सातारा, इस्लामपूर आदी ठिकाणी या सर्व उत्पादनांची विक्री सुरू आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम प्रमाणपत्र त्यांना दिले आहे. या व्यवसायात अवधूत यांना त्यांच्या पत्नी आर्या यांचे सहकार्य व बॅंक आफ महाराष्ट्र देवरूख शाखेकडून अर्थसाहाय्य लाभले आहे.

"भरघोस पीक घेऊन भरघोस पैसा मिळविण्याच्या नादात, सध्या अनेकजण पाश्‍चात्त्य भेसळयुक्‍त खाद्य संस्कृतीच्या आहारी जात आहेत, त्यामुळे अनेक आजार उद्‌भवत आहेत. ही बाब ओळखून तरुणवर्गाने भेसळमुक्‍त शेती व उद्योगांकडे वळणे आवश्‍यक आहे."

- अवधूत मेस्त्री, पाटगाव

संपादन - स्नेहल कदम 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT