Quarantine made 54  people in the separation room in mandangad kokan marathi news
Quarantine made 54 people in the separation room in mandangad kokan marathi news 
कोकण

पत्नी मंडणगडात तर पती दापोलीत क्कारंन्टाईन....

सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : कोरोनाच्या भीती व लॉकडाऊनमुळे सारेच ठप्प असल्याने मुंबईत राहणारे तालुक्यातील चाकरमानी पुरते हवालदिल झाले आहेत. मुंबईत कामधंदा नसल्याने व पैसा अडकाठी संपल्याने चाकरमानी चिंतेत आहे. मिळेल त्या मार्गाने गावी येण्याचा अनेकांचा कल दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, नालासोपारा, उरण येथून दोनशे किमी चालत तालुक्यात आलेल्या ५४ जणांना गेल्या दोन दिवसात म्हाप्रळ व मंडणगड येथील आरोग्य विभागाच्या विलगीकरण केद्रांत कोरोन्टाईन करण्यात आले आहे.

मुंबईतील मोठ मोठ्या इमारती बंद करण्यात आल्या. या इमारतींच्या आडोशांना आसऱ्याला असणारे तालुक्यातील अनेक जण जेवण व निवारा गेल्याने पाई चालत मंडणगडात आले आहेत. पाई चालत आलेल्या नागरीकांमध्ये दापोली तालुक्यातील तेवीस जणांचा समावेश आहे. मंगळवार,  बुधवार या दोन दिवसात पन्नास जण पायी चालत तालुक्यात दाखल झाले.

जिल्ह्याच्या सर्वच सीमा बंद

म्हाप्रळ येथे या सर्वांना ताब्यात घेण्यात आले. म्हाप्रळ जि.प. शाळा व मंडणगड शहरातील नुतन विद्यामंदिरात विलगीकरण कक्षात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले असून जिल्ह्याच्या सर्वच सीमा बंद करण्यात आल्या आहेत. सूचना केल्या जात असतानाही त्याकडे कानाडोळा करत गाव गाठण्यासाठी काही चाकरमानी नवनव्या युक्त्यांचा अवलंब करत आहेत. काहीजण पोलिसांना चकवा देत गाव गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र पोलिसांच्या नाकाबंदीत त्यांना कारवाईला सामोरे जावे लागत आहे. निवारा व कामधंदा नसल्याने उपासमार होत असून याचमुळे पायी प्रवास करत गावी निघाली असल्याची माहीती पुढे आली आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून पुढील १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवण्यात येणार आहे.

विलगीकरण कक्षात ५४ जणांना केले क्कारंन्टाईन..
 मुंबई, नालासोपारा येथून आलेले दापोली तालुक्यातील बुरोंडी येथील १० जण, उरण येथून उनवशी येथील १३ व मंडणगडातील असावले, पंदेरी, कोंड गाव, इत्यादी ठिकाणचे १० जणांचा समावेश आहे. एकूण ३३ जणांना सुरक्षित ठेवण्यात आले आहे. तर नुतन विद्यामंदिर मंडणगड येथे २१ जणांना विलगीकरण करण्यात आले असून एकूण ५४ जणांना विलगीकरण करण्यात प्रशासनाला यश आले आहे.

मंडणगडात पोहचले कसे?
संचारबंदी, जिल्हा बंदीच्या काळात मुंबईतून मंडणगड पर्यंत लोक आले कसे हा प्रश्न उपस्थित केला जातो आहे. पनवेल, रायगड जिल्ह्यांच्या हद्दी आणि अनेक तालुक्यांचा पायी प्रवास करीत असताना दोनशे ते अडीचशे किमीचा प्रवासात त्यांना कुठेही थांबविण्यात आले नसल्याची बाब उघड होत आहे. 

पत्नी मंडणगडात पती दापोलीत क्कारंन्टाईन..
  मुंबईत चालत प्रवास करीत आलेल्या नागरिकांना मंडणगडच्या सिमेवर ताब्यात घेवून विलगिकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. यात दुचाकीवरुन पती पत्नी तालुक्यातून जात असताना पोलीसांना बघून पत्नी खाली उतरली. पतीने पोलीसांना चुकवत पोबारा केली. त्यामुळे पत्नीला म्हाप्रळ येथील कक्षात कोरोन्टाईन करण्यात आले आहे. तसेच दुचाकीवरून निघून गेलेल्या पतीलाही दोपोलीत विलगीकरण कक्षात घेतल्याने पत्नी म्हाप्रळ (मंडणगड) आणि पती दापोलीत अशी अवस्था झाली. प्रशासनाने सर्वांची व्यवस्था केली आहे.

सिमांवर अधिक पोलीस यंत्रणा
मंडणगड तालुक्याच्या सर्व सिमांवर अधिक पोलीस यंत्रणा अधिक सतर्क आणि चोख करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या आदेशानुसार तालुक्यात येणाऱ्यांना त्वरित ताब्यात घेवून विलगीकरण कशात ठेवण्यात येईल. शहर परिसरात विनाकारण वाहने घेवून फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
- सुदाम शिंदे, पोलिस निरीक्षक.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT