भोमाळे 
कोकण

रायगड: तळई दरड दुर्घटनेत एकूण 44 जणांचा बळी; बचाव कार्य सुरुच

सकाळ वृत्तसेवा

तळई गावात दरड कोसळून 44 जणांना मृत्यू झाल्याची माहिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे.

रायगड: तळई गावात दरड कोसळून 36 जणांना मृत्यू झाल्याची माहिती होती. आता मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. रायगडमधील दोन वेगवेगळ्या दरड कोसळण्याच्या घटनांमधील एकूण मृतांचा आकडा 44 वर पोहोचला आहे. अजूनही 25 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाने मुसळधार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत. महाड तालुक्यातील नाते रोडवर तळीये गावात दरड कोसळली आहे. याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 32 घरावर ही दरड कोसळली असून यामध्य 72 जण बेपत्ता असल्याची माहिती समजते. सध्याच्या माहितीनुसार 36 जणांना मृत्यू झालाय. जवळपास 80-85 जण बेपत्ता आहेत. त्यातील 33 मृतदेह सापडले आहेत. एनडीआरएफ स्थानिक प्रशासनाच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन पार पडत आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे शहरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टी होत असून हाहाकार माजला आहे. महाड तालुक्यात तळई येथे रात्री दरड कोसळल्याने 32 घरे दबली गेली. त्यानंतर मदतकार्य सुरु करण्यात आले. माहितीनुसार ढिगाऱ्याखालून 44 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अनेकजण बेपत्ता असल्याचं सांगण्यात आलंय. शिवाय मृताची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाऊस पडत असल्याने मदत कार्यात अडथळा येत आहे.

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोकणसह मुंबईकरांना अनेक प्रकारचे त्रास भोगावे लागत आहेत. नुकतीच मुंबईतील गोवंडी भागात एक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात ही दुर्घटना घडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SL vs AUS, T20 WC: आराsssssरा खतरनाक! ग्लेन मॅक्सवेलचा रिव्हर्स स्विप अन् पथूम निसंकाचा चपळ झेल; सर्वोत्कृष्ट कॅच Video

Faridabad Factory Fire : 'केमिकल ड्रम्स'चे स्फोट झाल्याने फॅक्टरीत भीषण अग्नितांडव!, दोन पोलिसांसह ३५ जण होरपळले

Latest Marathi News Update : भाजपला उघडे पडणारच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा

ILS Law College Fee Case : शुल्क परताव्याबाबत राज्य सरकारने दोन महिन्यांत निर्णय घ्यावा; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

Sahar Shaikh Video: ओवैसी बंधूंसमोरच सहर शेख यांची १५ मिनिटांची भाषा; व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT