Loksabha Election 2024  sakal
कोकण

Loksabha Election 2024 : कोकणातल्या लढतींना बहुविध आयाम

रायगड आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी कोकणातले दोन मतदारसंघ. या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी या दोन्हींत चुरस आहे. दोन्ही ठिकाणचा संघर्ष कधी विकासाच्या संकल्पनांचा आहे, कधी असली-नकली शिवसेना कोणती असा आहे तर कधी नेत्यांशी निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे.

मृणालिनी नानिवडेकर ः सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई : रायगड आणि सिंधुदुर्ग-रत्नागिरी कोकणातले दोन मतदारसंघ. या मतदारसंघात महायुती व महाविकास आघाडी या दोन्हींत चुरस आहे. दोन्ही ठिकाणचा संघर्ष कधी विकासाच्या संकल्पनांचा आहे, कधी असली-नकली शिवसेना कोणती असा आहे तर कधी नेत्यांशी निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे.

कोकणी माणूस कष्टाळू अन् स्पष्टवक्ताही. त्यामुळे कोकणात स्पष्ट मते मांडली जाताहेत अन् आपापली मते हिरीरीने मांडली जात आहेत. दूरवर पसरलेली एकटीदुकटी गावे, विरळ वस्ती यामुळे प्रचार थकवणारा आहे पण उमेदवार उत्साहात आहेत. ‘‘कोकण आपलोच असा’’ ही मुंबईतल्या शिवसैनिकांची भावना. बाळासाहेब ठाकरेंचे या भागाला प्रेम. चाकरमानी मुंबईकर जी मनीऑर्डर पाठवे, तोच अर्थव्यवस्थेचा आधार.

त्यामुळे मुंबईत शिवसेना वाढली तशीच इथेही फोफावली. आज तो वारसा आपल्याकडेच राहावा, यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी या मतदारसंघात दोनदा सभेसाठी जायचे ठरवलेय. खासदार या नात्याने विनायक राऊत यांचा संपर्क उत्तम आहे. ते मतदारसंघातच गेले वर्षभर आहेतच. पण समोर या वेळी प्रथमच कमळ चिन्हावर निवडणूक लढणारे नारायण राणे उभे आहेत.

राणेंनी ही माझी शेवटची निवडणूक असेल, असे जाहीर केले आहे. ते आज उद्धव ठाकरेंना आव्हान द्यायला उभे राहिलेले नाहीत. त्या दोघांमधला संघर्ष जुना आहे. शिवसेनेतून नाराज झालेल्या राणेंनी बंड केले. आता राणे केंद्रीय मंत्रीपदावर आहेत. मोदीलाटेत कॉँग्रेसकडून त्यांचे चिरंजीव नीलेश खासदारकीच्या निवडणुकीत पराभूत झाले खरे पण दोन लाखांवर अधिक मते घेवून.

ती मते अन् भाजपने आता या भागात केलेला प्रवेश ही राणेंची पुंजी आहे. रत्नागिरीत शिवसेना शिंदेगटाचा उदय सामंत यांच्यासारखा मोहरा मदतीला आहे. त्यांचे भाऊ किरण यांच्या उमेदवारीसाठी त्यानी नेटाने प्रयत्न केले, मात्र उमेदवारी मिळाली नाही. तो आता इतिहास आहे. राणेंनी सिंधुदुर्ग परिसरात केलेला विकास त्यांना तिकडची मते मिळवून देऊ शकेल. कोकणपट्टीत होणाऱ्या नाणार, बारसू, जैतापूर अशा सर्व प्रकल्पांना ठाकरेंनी केलेला विरोध राणेंना मान्य नाही. राणेंनी पर्यटनासाठी मोठे प्रयत्न सुरु ठेवले आहेत. धाकटा मुलगा नीतेश राणे हे भागातले आमदार. मात्र राणेंच्या विकास संकल्पनांना राऊत आणि शिवसेनेचा विरोध आहे. जैतापूरऐवजी हरीत उर्जा पठारांवर तयार व्हावी, असे त्यांना वाटते. संघर्षाचा हाही मुद्दा आहे. राज ठाकरे हे नारायण राणेंच्या प्रचाराला जाणार आहेत. संघर्षाचा हाही मुद्दा चर्चेत आहे.

महायुतीचे हायप्रोफाइल उमेदवार...

महायुतीचे दोन्ही उमेदवार हायप्रोफाइल अन् शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे या दोघांसमोर तसे छोटे वाटणारे. पण सहानुभूती अन् अल्पसंख्याकाचा पाठिंबा ही त्यांची शक्तिस्थळे. कोकण पिळदार इतिहास असलेला भाग. आज वर्तमानाचे कंगोरेही तीव्र आहेत.

रायगडातही धुमशान

रायगडात सुनील तटकरे घड्याळ चिन्हावर अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉँग्रेसतर्फे लढताहेत. त्यांना आव्हान देताहेत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे अनंत गीते. गीते एकेकाळी केंद्रीय मंत्री होते. मितभाषी. त्यांच्या पाठीशी कुणबी समाजाची मते आहेत. गेल्या निवडणुकीत तटकरेंनी त्यांना पराभव केला होता. यावेळी संघर्ष जुन्या दोघांतच आहे पण विचारधारा बदलली. तटकरेंशी या भागातल्या शिंदेसमर्थकांचे मतभेद होते. ते आता मिटले आहेत. ऐक्याच्या आणाभाका घेतल्या गेल्या आहेत. तटकरेंची कन्या आदिती राज्यात मंत्री आहे. पूर्वी भरत गोगावले हे शिंदेसमर्थक तटकरेंवर नाराज असत. सर्वाधिक वाद मविआतला या जिल्ह्यात सुरू होता. आता संघर्ष संपला आहे म्हणतात. रायगडात अनेक प्रकल्प सुरू असतात. जिल्हा तसा पैसा अडका बाळगणारा. तेथे कंत्राटदारविरुद्ध स्थानिक असाही संघर्ष आहे. विकासाचे मुद्दे थोडेफार चर्चेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT