अलिबाग : टपरीधारकांनी नव्या हंगामाच्या तयारीला सुरुवात केली आहे. 
कोकण

सीआरझेडचा निसर्गग्रस्त टपरीधारकांना फटका; नव्या हंगामाची सुरुवात मदतीविनाच

महेंद्र दुसार

अलिबाग : निसर्ग चक्रीवादळाचे रायगडमधील पर्यटन व्यवसायाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. परंतु यातील अनेक टपऱ्या सीआरझेड क्षेत्रात येत असल्याने सरकारकडून त्यांना कोणतीही मदत अद्याप देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीतून नव्या हंगामाची तयारी हे व्यावसायिक करत आहेत. 

3 जूनच्या चक्रीवादळाने रायगड जिल्ह्यातील किनाऱ्यावरील झाडे मुळासह उपटून निघालेली आहेत. दिवेआगर, मुरूड, काशिद, वरसोली या समुद्रकिनाऱ्यांचे सौंदर्य लयाला गेले. यात पर्यटकांसाठी चहा, नास्ता, खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यावसायिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. या वादळात 80 टक्के टपऱ्या वादळात उडून गेल्या होत्या. यांची डागडुजी करून नव्याने सुरुवात करण्याचा प्रयत्न या व्यावसायिकांचा आहे. यातील अनेक झोपड्या या समुद्रकिनारी सीआरक्षेड क्षेत्रात येत असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांना अनधिकृत ठरवत नुकसानभरपाई देण्यास टाळले आहे.

काशिद, वरसोली येथील अनेक टपरीधारकांना यामुळे नुकसानभरपाई मिळालेली नाही. यामुळे त्यांना टपऱ्यांची डागडुजीही करता आलेली नाही. सरकारकडून काहीतरी प्रमाणात मदत मिळेल, या आशेने हे टपरीधारक होते. अखेर मदत न मिळाल्याने त्यांनी स्वतःहून डागडुजी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु, नुकसान इतक्‍या मोठ्या प्रमाणात आहे की, ठिगळ लावणार तरी कुठे कुठे? अशी परिस्थिती या टपरीधारकांची झाली आहे. त्यामुळे सर्व व्यवसायाची जुळवाजुळव नव्याने करावी लागत आहे. 

समुद्रकिनाऱ्यावरील टपरीधारकांना सरकारकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. मदत मिळेल या प्रतीक्षेत हे सर्वजण होते. अखेर त्यांनी स्वतःहून दुरुस्तीला सुरुवात केली. 
- नम्रता कासार, सरपंच, ग्रामपंचायत काशिद 

ज्या टपऱ्या स्वतःच्या मालकी जागेत आहेत, त्यांना नुकसानभरपाई दिलेली आहे. मात्र, ज्या टपऱ्या सीआरझेडमध्ये अनधिकृत आहेत, त्यांना भरपाई देता येणार नाही. 
- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड 

(संपादन : उमा शिंदे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anjangaon: खेलोबा देवस्थानाची जागा असल्याचे मान्य! शिवरायांच्या पुतळ्याबाबत अखेर तोडगा; राजन पाटलांची मध्यस्थी, एका रात्रीत काय घडलं?

Sangli Sambhaji Maharaj Statue : सांगलीत रात्रीतून छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रयत्न; पोलिसांकडून तात्काळ कारवाई

Nashik Dindori Car Accident : नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली, ७ विद्यार्थ्यांसह ९ जणांचा दुर्दैवी अंत, ​स्नेहसंमेलन आटोपून घरी परतताना घटना

Spicy Thecha Paneer Wrap: वीकेंड नाश्त्यासाठी बनवा झणझणीत थेचा-पनीर रॅप; फक्त २० मिनिटांत तयार होणारा हेल्दी ऑप्शन!

Daily Panchang 4 April 2026 : शनिवारचे शुभ मुहूर्त, राहूकाळ आणि दिनविशेष जाणून घ्या

SCROLL FOR NEXT