अतुल बंगे sakal
कोकण

राजन जाधव तुम्ही भाजपचे तिकीट मिळवून दाखवाच; अतुल बंगेंचे आव्हान

सकाळ वृत्तसेवा

कुडाळ (सिंधुदुर्ग) : राजन जाधव, (Rajan Jadhav)आता तुम्ही गेल्या घरी सुखी रहा. पुढे जायचे असेल तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत नाही तर तिथेच राहायचे असेल पंचायत समिती निवडणुकीत केवळ भाजपचे तिकीटच मिळवून दाखवा, असे आव्हान शिवसेना पदाधिकारी अतुल बंगे (Atun Bange) यांनी दिले.

बंगे म्हणाले, ‘‘माजी सभापती राजन जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे आम्ही स्वागत करतो. भाजपमध्ये जाऊन चांगली कामगिरी केली आहे. विद्यमान सभापती यांच्याशी वाद घालणारे राजन जाधवच होते. आता हे वाद ते त्यांच्या पक्षात गेल्याने निश्चित मिटतील काय? हा प्रश्नच आहे. ते शिवसेना पक्षाचे एक साधे शिवसैनिक असूनही कुडाळ पंचायत समितीचे सभापती हे मोठे पद शिवसेनेच्या माध्यमातूनच मिळाले याचा वापर त्यांनी जनसंपर्कासाठी करून यापेक्षा अनेक मोठी पदे भूषविली असती; पण देव देतो आणि कर्म नेतो, अशी अवस्था जाधव यांची झाली आहे. पावशीमधून केवळ नी केवळ ते शिवसेनेमुळे तेथील मतदारांनी शिवसेनेवर केलेले प्रेम यामुळेच निवडून आले होते, हे ते विसरूच शकत नाहीत.

भाजपमध्ये जाण्याची दुर्बुद्धी त्यांना सुचली आणि पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या’पासून जाधव यांची सुरुवात झाली आहे असेच म्हणावे लागेल. ही जाधव यांची प्रगती नसून अधोगतीच आहे. आता तुम्ही गेल्या घरी सुखी रहा; परंतु येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे फक्त तिकिटच मिळवुन दाखवा.’’

खापर शिवसनेना नेत्यांवर का?

आमदार वैभव नाईक यांनी वेळोवेळी अपमानित केले किंवा विकासकामे केली नसल्याचा आरोप जाधव आणि त्यांच्या दोन सदस्यांनी केला होता. यावर बंगे म्हणाले, ‘‘आमदार नाईक असो वा खासदार विनायक राऊत असो यांनी कायमच शिवसैनिकांना सन्मान दिला; परंतु सभापतीपदाच्या खुर्चीवर बसल्यापासून डोक्यात हवा गेलेल्या लोकांची किव कराविशी वाटते. विकासकामे करताना कसलाही भेदभाव आमदार नाईक किंवा खासदार राऊत यांनी केला नाही असे असताना तुम्ही स्वार्थासाठी पक्षप्रवेश केलात म्हणून नाईक किंवा राऊत यांच्यावर खापर फोडून नामा निराळे होऊ नका.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

Shirur Crime: शिरूर बीएसएनएल कार्यालय फोडून सोन्या-चांदीचे दागिने लांबवणारी टोळी जेरबंद; १८.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Kannad Theft: कन्नड बसस्थानकातील महिलेची तीन लाखांची सोन्याची पोत लांबवणारा चोरटा अवघ्या पाच तासांत जेरबंद

CM Gram Sadak Road Safety: प्रशासन झोपेत असताना शेतमजुराचा पुढाकार; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील ‘मृत्यूचा खड्डा’ अखेर बुजला

SCROLL FOR NEXT