esakal
esakal
कोकण

आयुक्तांवर हक्कभंग आणून दाखवाच; राजन तेलींचे केसरकरांना खुले आव्हान

सकाळ डिजिटल टीम

कुडाळ : सावंतवाडी (Sawantwadi) तालुक्यातील आंबोली-चौकुळ गेळे येथील कबुलायदार प्रश्नी कोकण आयुक्त पाटील यांनी स्थानिक आमदार दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या अनुपस्थितीत बैठक घेतली होती. त्यामुळे आमदार केसरकर यांनी आपल्याला बैठकीत डावलले असल्याबाबत खंत व्यक्त करत कोकण आयुक्तांवर विधानसभेत हक्कभंग आणणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांनी समाचार घेत हिंमत असेल तर कोकण आयुक्तांवर आमदार केसरकरांनी हक्कभंग आणावा, असे खुले आव्हान दिले आहे.

आमदार केसरकर आयुक्तांवर हक्कभंग करण्याची भाषा करतात हे योग्य नाही. हक्कभंग कधी आणतात हे केसरकर यांना माहित आहे का?

यावेळी तेली म्हणाले, "सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक केसरकर गेली बारा वर्षे आमदार म्हणून काम करत आहेत. त्यात पाच वर्षे ते मंत्री होते. मग मंत्री असताना आंबोली-चौकुळचा कबुलायदार प्रश्न त्यांना का सोडवता आला नाही? आता तो प्रश्न सुटावा, यासाठी त्या ठिकाणचे ग्रामस्थ वारंवार मागणी करत आहेत. सावंतवाडी येथे तेथील ग्रामस्थांनी धरणे आंदोलन सुध्दा केले. अशावेळी कोकण आयुक्तांना आम्ही विनंती केली की, तुम्ही स्वतः ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घ्या. आमच्या विनंतीला मान देत कोकण आयुक्त पाटील आंबोली येथे आले. त्यांनी ग्रामस्थांसमवेत बैठक घेतली आणि ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या. म्हणून आमदार केसरकर यांना पोटशुळ उठत असेल, तर ते योग्य नाही.

ग्रामस्थ आपल्या हक्कासाठी आयुक्तांसमोर बाजू मांडू शकतात. त्या बैठकीला स्थानिक आमदारांना बोलवायलाच पाहिजे, अशी काही आवश्यकता नाही. तरी सुध्दा आमदार केसरकर आयुक्तांवर हक्कभंग करण्याची भाषा करतात हे योग्य नाही. हक्कभंग कधी आणतात हे केसरकर यांना माहित आहे का? आयुक्त हे शिवसेनेचे अधिकारी किंवा कार्यकर्ते आहेत का? तुम्ही हक्कभंग आणाच, नाही तर राजीनामा देणार का ते सांगा. हा प्रश्न खऱ्या अर्थाने चंद्रकांत पाटील महसूल मंत्री असताना सुटण्याच्या तयारीत होता; पण आमची सत्ता गेल्यामुळे या निष्क्रिय आघाडी सरकारने हा प्रश्न रेंगाळत ठेवला.

आपल्या जमिनीत या लोकांना काहीच करता येत नाही. खरेतर सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले या नगरपंचायती भाजपकडे आहेत. आता लोक विचार करत आहेत की कोण चांगले काम करते. म्हणूनच सावंतवाडी मतदार संघातील जनता भाजपच्या मागे खंबीरपणे उभी आहे."

ते पुढे म्हणाले, "मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अनेक कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यातील काही कामे लोकप्रतिनिधीच करत आहेत. या सर्व कामांच्या मागे कोण आहे? कामे करताना लांबी, रुंदी पाळली जाते की नाही? अधिकारी व ठेकेदार यांच्या संगममतानेच ही कामे सुरू आहेत. योग्य वेळी या सर्व गोष्टींचा उलघडा केला जाईल. जलसंधारणमध्येही राजकारणी आणि अधिकार्‍यांमध्ये मिलीभगत आहे. जिल्ह्यातील जलसंधारण विभागामधील कामांमध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसारखीच स्थिती आहे. ठेकेदार, राजकारणी आणि त्या विभागाचे अधिकारी यामध्येच ही कामे सुरू आहेत. या सर्व गोष लक्ष द्यावा."

येथील एमआयडीसी रेस्टहाऊस येथे तेली यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, कुडाळ मंडळ अध्यक्ष विनायक राणे, युवा नेते आनंद शिरवलकर, भाजप युवा मोर्चाचे बंड्या सावंत, शहराध्यक्ष राकेश कांदे, तालुका सरचिटणीस देवेंद्र सामंत आदी उपस्थित होते.

घोटाळ्यास अधिकारीच जबाबदार

जिल्ह्यातील वॉटर प्युरिफायर घोटाळ्याप्रश्नी अधिकारीच जबाबदार आहेत. कारण या खरेदी व्यवहारामध्ये सह्या कुणाच्या आहेत? कुणाच्या सह्या लागतात ते बघा. या प्रकरणात राजकीय व्यक्ती कोण असती, तर त्या व्यक्तीचे नाव आले असते; पण तसे काही दिसत नाही. त्यामुळे विरोधकांच्या तक्रारीत काहीही तथ्य नाही. विरोधकांनी केवळ चर्चेत राहण्यासाठी या तक्रारी केल्या आहेत, असे तेली यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT