rajapur atmosphere of fear in the population 
कोकण

बिबट्याने माजवलीय या गावात दहशत...

सकाळ वृत्तसेवा

राजापूर (रत्नागिरी) : मुबई -गोवा महामार्गानजीक वसलेल्या खरवते वाणीवाडीतील गोरेवस्तीमध्ये बिबट्या घुसल्याने लोकवस्तीमध्ये भीतीचे वातावरण निंंर्माण झाले आहे. या वस्तीमध्ये राहत असलेल्या बहुतांश कुटुंबामध्ये पुरुषांच्या तुलनेत महिला आणि लहान मुले जास्त आहेत. दोन दिवसंपूर्वी रात्री 8.30 वा च्या सुमारास जेवण उरकून झोपण्यासाठी गोरे यांनी घरातील लाईट घालविली. अन काही क्षणात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अंधाराचा फायदा घेत घराच्या मागच्या पडवीत बसलेल्या कुत्र्याला घेऊन जंगलात धूम ठोकल्याची घटना घडली. बिबट्याच्या या मुक्त वावरामुळे लोकवस्तीमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.


खरवते येथील वाणीवाडी जवळील महामार्गावर गोरेवस्ती वसलेली आहे. या वस्तीमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतकी कुटुंबे राहत असून त्यामध्ये बहुतांश महिला आणि लहान मूले आहेत. या लोकवस्तीच्या अवतीभवती आंब्याच्या बागा आणि जंगल परिसर आहे. लॉकडाऊनमुळे महामार्गावर गाड्यांची रहदारी आणि त्यातून लोकांचीही वर्दळ कमी आहे. त्यामुळे गोरे वस्तीमध्ये बिबट्याचा मुक्तपणे संचार आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्याने या लोकवस्तीतील गाय मारली होती. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी बिबट्याने घराच्या मागच्या पडवीतील गोरे कुटुंबीयांचा कुत्रा पळविल्याची घटना घडली.


लोकवस्तीमध्ये मुक्तपणे फिरणाऱ्या बिबट्याने लोकवस्तीमध्ये बिनदिक्कतपणे घुसून आधी गाय मारल्याने आणि आता कुत्रा पळविल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे वस्तीमधे मुक्तपणे फिरून दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याचा वनखात्याने तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी येथील लोकांकडून केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळी मदतीला दोन हेक्टरची मर्यादा, तीन हेक्टरचे पंचनामे, राज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

स्मार्ट सल्ला : इच्छापत्राची समंजस अंमलबजावणी

अर्थबोध : शेअर बाजाराची ऐतिहासिक घसरण काय सांगते?

Pune MPSC Protest: आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही आंदोलनाची धग कायम; आंदोलनाच्या चौथ्या दिवशीही नेत्यांची रीघ, परीक्षा पद्धतीवरून विद्यार्थ्यांमध्ये मतभेद

Maharashtra Weather : मॉन्सून अर्ध्या महाराष्ट्रातून माघारी; ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला, मुंबईसह ५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT