कोकण

राजापूर तालुक्यातील एकोणतीस पर्यटनस्थळांचा विकास आराखडा तयार

सकाळवृत्तसेवा

राजापूर - पर्यटकांचे लक्ष वेधून घेत असलेल्या तालुक्‍यातील "क" वर्ग पर्यटनस्थळांचा विकास करण्याच्या हालचाली प्रशासकीय पातळीवर सुरू झाल्या आहेत. निवड केलेल्या पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तालुक्‍याचा प्रशासनातर्फे पर्यटन विकास आराखडा तयार केला जात आहे. 

या आराखड्यामध्ये पाण्याने वेढलेल्या जुवे, पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या चुनाकोळवण येथील सवतकडा, उन्हाळे येथील गंगातीर्थ, शहरातील ब्रिटिशकालीन वखार यांसह तालुक्‍यातील सत्तावीस ठिकाणांचा प्राथमिक स्तरावर समावेश आहे. 

तालुक्‍यातील अनेक गावांना निसर्गसौंदर्याचा वारसा आहे. या निसर्गसौंदर्याला पर्यटनदृष्ट्या साज दिल्यास, त्या ठिकाणी पर्यटकांसाठी सोयीसुविधांची उभारणी केल्यास या ठिकाणांकडे पर्यटकांचे लक्ष वेधू शकते. त्यातून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. पर्यटनस्थळांच्या ठिकाणी अनेक सुविधांची वानवा आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी चांगले रस्ते नाहीत, स्वच्छतागृह आणि प्रसाधनगृहे, विजेची सुविधा आदींची वानवा आहे. या साऱ्या प्राथमिक सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध दिल्यास निश्‍चित पर्यटकांची पावले त्या ठिकाणी वळतील. 

समाविष्ट गावे 
जुवे, माडबन, दांडे अणसुरे, साखर, चुनाकळवण-सवतकडा, वेत्ये, धोपेश्‍वर, देवीहसोळ, भालावली, तेरवण, मूर-काळेश्‍वर मंदिर, करक, अर्जुना धरण प्रकल्प, पाचलोबा मंदिर, पाचल-दिवाळवाडी (फिश टॅंक, फेरीबोट), कशेळी, वाडातिवरे, आंबोळगड, मुसाकाझी, गोवळ, देवाचेगोठणे, उन्हाळे-गंगातीर्थ, कोंड्येतर्फ सौंदळ, जुवाठी, केळवली, दोनिवडे, पांगरे बुद्रुक, शहरातील ब्रिटीशकालीन वखार, गणेश विसर्जन घाट 

या सुविधा उभारणार 

  • पर्यटनस्थळापर्यंत पोचण्यासाठी रस्ता, विजेची सोय,
  • सार्वजनिक जलनिस्सारण व्यवस्था, स्वागत कक्ष, प्रसाधनगृह आणि स्वच्छतागृह बांधणे,
  • वाहनतळ, पारंपरिक साहित्य विक्रीसाठी दुकान वा गाळा उभारणे, खुला मंच, सांस्कृतिक केंद्र. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

काँग्रेसला मोठा धक्का! दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्षाने दिला पदाचा राजीनामा, सांगितलं कारण

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे मोदींपेक्षा मोठे नेते, छगन भुजबळांचा टोला

SCROLL FOR NEXT