Narayan Rane esakal
कोकण

रत्नागिरीच्या पर्यटनासाठी भाटलेकरांचे नारायण राणेंना साकडे

मकरंद पटवर्धन...

रत्नागिरी : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी (Tourism Development) अनेक सुविधा व निधी मिळण्याबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना (Minister Narayan Rane) रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष राजू भाटलेकर (Raju Bhatlekar) यांनी निवेदन दिले. जिल्ह्यातील गड, किल्ल्यांची अवस्था दयनीय असून पर्यटनस्थळी जाण्याकरिता रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यांची दुरुस्ती करण्याची मागणीही त्यांनी केली.

केंद्र सरकारकडून पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे.

केंद्र सरकारकडून पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. निधी आला तरच रत्नागिरी जिल्ह्याचा सक्षम पर्यटन विकास होईल. रस्त्यांची समस्या गंभीर असून अनेक रस्ते खराब झाले आहेत, तर नवीन रस्ते करणे जरुरीचे आहे. समुद्र किनाऱ्यांवर पार्किंग, टॉयलेट, पाणी, विजेची व्यवस्था होणेही आवश्यक आहे. या सर्व व्यवस्था समुद्रकिनारी झाल्यास तेथे फार मोठ्या प्रमाणात पर्यटक येऊन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल, असेही भाटलेकर यांनी म्हटले आहे.

केंद्र सरकारने सीआरझेड नोटीफिकेशन २०१९ मधील धोरण ठरवल्यास, येथील हॉटेल व्यावसायिकांना दिलासा मिळेल. तसेच कातळावर कोरलेल्या शिल्पांसाठी शासनाकडून विशेष निधी मिळावा, पर्यटन माहिती केंद्र उभारावे, पर्यटन व्यावसायिकांसाठी शासन व बँकांकडून सबसिडी व कमी व्याज दरात कर्ज मंजूर करण्याची मागणीही केली आहे. कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी कोकण रेल्वेच्या गाड्या व ट्रेनची संख्या वाढविणे व थांबे वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच या पर्यटक व चाकरमान्यांसाठी फास्ट पॅसेंजर गाडी मुंबई ते सावंतवाडी मार्गावर सुरू करण्याची मागणीही केली आहे.

पर्यटन विभागाने सर्वेक्षण करावे

अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने प्राचीन मंदिरे, स्मारके असून त्यांचाही विकास होणे गरजेचे आहे. लोकमान्य टिळकांच्या जन्मस्थान स्मारकाची दुरवस्था झाली असून निधीची आवश्यकता आहे. कोरोनाच्या काळात हॉटेल व्यवसाय बंद असल्यामुळे त्यांना केंद्र सरकारकडून योग्य ते पॅकेज देण्यात यावे. पर्यटनावर आधारित अनेक कोर्सेस रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चालू करावेत. केंद्र सरकारच्या पर्यटन विभागाकडून सर्वेक्षण करून त्याप्रमाणे विविध योजना आणून रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटनदृष्ट्या विकास व्हावा, असेही भाटलेकर यांनी निवेदनात नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune : बाजीराव रोडवरील हत्या प्रकरणी मोठी अपडेट, आरोपींना अटक; तिघेही अल्पवयीन

Satara Municipal Election: मराठ्यांच्या राजधानीत हवा मराठाच नगराध्यक्ष?; साताऱ्यात दाेन्ही राजेंकडून मनोमिलनाचे संकेत मिळताच चर्चांना उधाण

माेठी बातमी! 'महाबळेश्वर तालुक्यातील छमछमवर पाेलिसांचा छापा; सहा जणांवर गुन्हा; बंगल्यावरील धक्कादायक प्रकार उघडकीस..

Ramraje Naik-Nimbalkar: नार्को चाचणी त्यांची त्यांनीच करावी: रामराजे नाईक-निंबाळकर; एकाही घटनेच्या मागे मी आहे, सिद्ध करून दाखवा

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना देणार भेटी

SCROLL FOR NEXT