रत्नागिरी : शहराच्या प्रत्येक प्रभागात भाजपचे कार्यकर्ते नगराध्यक्ष पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी कार्यरत झाले आहेत. घरोघरी पत्रके देण्यापासून छोट्या सभा, शहरामध्ये मतदारांना कोणकोणत्या सुविधा देणार, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जात आहेत. भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी ऍड. दीपक पटवर्धन हेसुद्धा ठिकठिकाणी प्रचारात मग्न आहेत.
शहरातील नागरिकांना उत्तम रस्ते, मुबलक पाणीपुरवठा, स्वच्छ शहर या प्राथमिक सुविधा मिळाव्यात, याकडे कटाक्ष ठेवणार आहे. विद्यार्थ्यांना उत्तम शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, यासाठी पालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्याला अग्रक्रम दिला जाईल. शहर अधिक प्रगतीशील होण्यासाठी, विकासाच्या वाटेवर अधिक गतिमान होण्यासाठी सर्वोत्तम प्रयत्न करणार आहे, असे ऍड. पटवर्धन यांनी प्रचारादरम्यान सांगितले.
रत्नागिरीचा कारभार हाकण्याची संधी मिळाली
मी एका सामान्य कुटुंबातला, साधेपणाचे संस्कार झालेला, कष्टाने स्वतःची प्रतिमा कमावलेला माणूस आहे. व्यक्ती म्हणून घडवताना माझ्या पालकांनी मला सर्वात उत्तम संस्कार दिला, तो आहे सर्वसमावेशकतेचा ! त्यामुळेच वैभवशाली परंपरा लाभलेल्या या रत्नागिरीचा कारभार हाकण्याची संधी मिळाली तर हाच संस्कार घेऊन विकासाभिमुख आणि पारदर्शी कारभार करेन, असेही ऍड. पटवर्धन प्रचारादरम्यान सांगत आहेत.
रत्नागिरी शहर पदवीधर मंचाचा पाठिंबा
ऍड. पटवर्धन यांना रत्नागिरी शहर पदवीधर मंचाने पाठिंबा जाहीर केला. यानिमित्ताने पदवीधर, सुसंस्कृत नगराध्यक्ष रत्नागिरीला लाभावा, यासाठी पदवीधर मंचाचे कार्यकर्ते प्रचारकार्यात गुंतले आहेत. शहरी व सुशिक्षित मानसिकता असलेल्या विविध मतदारांच्या भेटीगाठी हे कार्यकर्ते घेत असून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा मंचाने केला आहे. शहरातील सांस्कृतिक क्षेत्रातील गायक, वादक, अभिनेते, दिग्दर्शक आदी कलाकारांनीही ऍड. पटवर्धन यांनी पाठिंबा दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.