कोकण

जिल्हाधिकाऱ्यांचे फेसबुक अकाउंट हॅक; Hacker करतोय पैशाची मागणी

राजेश कळंबटे

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हाधिकारी यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याने आणि त्याद्वारे पैशाची मागणी होत असल्याने खळबळ उडाली आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी बी. एन.पाटील यांच्या सरकारी अधिकृत Collectorate Ratnagiri या फेसबूक अकाउंटचे बनावट खाते तयार करून संबंधित व्यक्ती जनतेकडे पैशाची मागणी करत आहे. संबंधित अकाउंट बनावट असून ब्लॉक करून मेसेज आल्यास नजीकच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्हाधिकारी बी. एन. पाटील यांचे शासकीय योजनांची माहिती देण्यासाठी फेसबुक अकाउंट काढण्यात आले आहे. अज्ञात व्यक्तीने Collectorate Ratnagiri या नावे बनावट अकाउंट तयार करून रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिक,आधिकारी यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्यांच्याकडे पैशाची मागणी केली जात आहे.

रुग्णालय असल्याने पैशाची आवश्यकता आहे. अशा आशयाचे मेसेज मेसेंजर द्वारे अज्ञात व्यक्ती पाठवत आहे. तरी Collectorate Ratnagiri नावे बनावट असलेल्या अकाऊंटची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नये, ज्यांना अशा अकाउंट वरून फ्रेंड रिक्वेस्ट येथील त्यांनी नजीकच्या पोलिस स्थानकाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी बी.एन.पाटील यांनी फेसबुक अकाउंट द्वारे केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Instagram Disappears : विराटच्या लाखो फॉलोअर्सना मोठा धक्का!, 'किंग कोहली'चे इंस्टाग्राम अकाउंट गायब

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 30 जानेवारी 2026

आजचे राशिभविष्य - 30 जानेवारी 2026

ढिंग टांग : मफत अने नया बेपार…!

१२ जिल्ह्यातील शिक्षकांची पंचाईत! केंद्र सरकारची ‘सीटीईटी’ अन्‌ झेडपीचे मतदान एकाच दिवशी; इलेक्शन ड्युटी रद्द करण्यासाठी संघटना आक्रमक

SCROLL FOR NEXT