ratnagiri district surgeon residence key issue
ratnagiri district surgeon residence key issue 
कोकण

रत्नागिरी : शल्यचिकित्सकांच्या निवासाचे कुलूप तोडणार

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी - तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी कुलपाची किल्ली न दिल्याने नवनियुक्त शल्य चिकित्सकांच्या निवासाचा प्रश्‍न कायम आहे. शल्य चिकित्सकांनी याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. दोन महिने होऊन गेले तरी सरकारी निवासस्थानाची किल्ली न मिळाल्याने निवासस्थानाचे कुलूप तोडण्याचा निर्णय झाल्याचे समजते.

तत्कालीन शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांची सोलापूरला विनंती बदली होऊन दोन महिने झाले तरी त्यांनी निवासस्थान सोडलेले नाही. रुग्णालय प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही त्यांनी बंगल्याची किल्ली न दिल्याने नवीन शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. कोविडचा प्रादुर्भाव वाढलेल्या कालावधीत जिल्हा शल्यचिकित्सक पदावरून वाद सुरू झाला. शल्यचिकित्सक डॉ. बोल्डे असताना त्यांचा पदभार डॉ. संघमित्रा फुले यांच्याकडे देण्यात आला. यावरून शल्यचिकित्सक पदाची संगीत खुर्ची झाली होती; मात्र डॉ. बोल्डे यांची याच काळात सोलापूर येथे विनंती बदली झाली तर डॉ. फुले यांची रत्नागिरी जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून रीतसर आरोग्य विभागाने नियुक्ती केली. यामुळे त्या वादावर पडदा पडला.
बोल्डे यांची बदली सोलापूरला झाल्यानंतर ५ ऑक्‍टोबरला त्यांना कार्यमुक्त केले; मात्र दोन महिने झाले तरी अद्याप त्यांनी शासकीय निवासस्थान सोडलेले नाही. निवासस्थानाची किल्ली त्यांच्याकडे असल्याने विद्यमान शल्यचिकित्सकांना बंगल्यापासून वंचित राहावे लागले आहे. 

शल्यचिकित्सक म्हणून माझी रीतसर नियुक्ती झाली तर बोल्डेंची विनंती बदली झाली. त्यामुळे त्यांनी जाण्यापूर्वी निवासस्थानाची किल्ली सामान्य प्रशासनाकडे जमा करण्याची गरज होती. मी सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे. लवकरच त्यावर निर्णय घेऊन निवासस्थान ताब्यात मिळेल.
- डॉ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्यचिकित्सक, रत्नागिरी
 

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रमनदीपने अर्शिन कुलकर्णीचा घेतला अफलातून कॅच! स्टार्कला मिळाली पहिली विकेट

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT