ratnagiri hapus mango export to England by ship
ratnagiri hapus mango export to England by ship 
कोकण

पहिलाच प्रयोग ; 21 दिवसांचा प्रवास करत हापूस पोहचणार इंग्लडला....

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : इंग्लडमध्ये आंबा निर्यातीसाठी हवाईमार्गाचा अवलंब सर्रास केला जातो; मात्र यंदा कोरोनाच्या लढाईतही समुद्रमार्गे इंग्लडला आंबा पाठविण्यात आला आहे. बारामती बाजार समितीमधून सोळा टन आंबा पाठविण्यात आला आहे. त्यात दीड टन कोकणच्या हापूसचाही समावेश आहे. जहाजातून पाठविण्यात आलेला कंटेनर इंग्लडला एकवीस दिवसांनी पोचणार आहे.


फळांचा राजा म्हणून कोकणच्या हापूसची ओळख आहे. पण तेवढाचा तो संवेदनशीलही आहे. हवामानातील बदलांचा परिणाम त्यावर लगेचच होतो. झाडावरुन काढल्यानंतर तो जास्त काळ टिकून राहू शकत नाही. परदेशात हापूस पाठविण्यासाठी सर्रास हवाई वाहतूकीचा उपयोग केला जातो. भाडे अधिक असले तरीही दर्जा टिकवून ठेवणे शक्य होते. त्या तुलनेत केशर, बैंगनपल्लीसारखे अन्य जातीचे आंबे हे काहीकाळ टिकून राहू शकतात.

यंदा व्यापार्‍यांनी जहाजमार्गे आंब्याची वाहतूक करण्याचा प्रयत्न केला आहे. बारामतीमधील येथील रेम्बो इंटरनॅशनलच्या माध्यमातून ही निर्यात करण्यात आली आहे. कोरोना आपत्तीच्या कठीण काळात अनेक आव्हानांचा सामना करीत 25 एप्रिलपासून त्यांनी निर्यात सुरु केली होती. हापूसचा हंगाम संपुष्टात आला असून शेवटच्या टप्प्यातही रेम्बोद्वारे निर्यात केली आहे. बारामतीमधून कंटेनरने मुंबईतील बंदरात आंबा आणला गेला. त्यानंतर तो पुढे इंग्लडला जहाजातून फेलिक्सस्टोव्ह बंदरात पोचेल. 


समुद्रातून आंबा जाण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी लागणार असल्यामुळे ते फळ टिकवून ठेवण्याचे आव्हान असते. कोकणातील हापूसची साल कमी जाडीची असल्यामुळे कच्चा आंबा इंग्लडला पोचेपर्यंत टिकून राहण्यासाठी तापमान योग्य ठेवण्याची कसरत करावी लागणार आहे. त्यादृष्टीने नियोजन संबंधितांनी केले आहे. या कंटेनरमध्ये केशर, बैंगनपल्लीसह दीड टन कोकणातील हापूसचा समावेश आहे. कोरोना आपत्तीमुळे यंदा निर्यातीला मोठा फटका बसला आहे. या प्रयोगामुळे भविष्यात इंग्लडला कमी वाहतूक दरात आंबा पाठविण्याची दारे खुली होणार आहेत. इंग्लडमध्ये 3 जुलैला हा आंबा पोचणार असून भोसले एंटरप्रायझेसच्या माध्यमातून विक्री केला जाणार आहे.

समुद्रमार्गे जास्त कालावधीत लागत असल्यामुळे आंबा इंग्लडला पाठविण्यासाठी कोणीच तयार होत नाही. यंदा केलेला प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात मोठ्याप्रमाणात हापूस विक्रीला मिळू शकतो. त्यासाठी भोसले एंटरप्रयाझेसचाही विशेष प्रयत्न सुरू आहे.
तेजस भोसले, व्यावसायिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yamini Jadhav: यामिनी जाधव यांना शिवसेनेकडून दक्षिण मुंबईमधून उमेदवारी

Amit Shah Fake Video Case : अमित शाह फेक व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई, दोघांना अटक; आप अन् काँग्रेसशी लिंक?

Mumbai Indians: 'मुंबई संघात फूट पडलीये म्हणूनच...', ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार स्पष्टच बोलला

The Great Indian Kapil Show: अन् दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी आलं; 'या' कारणामुळे कपिल शर्मा शोमध्ये सनी आणि बॉबी देओल झाले भावूक

Nashik Fraud Crime : आर्किटेक्टला साडेपाच लाखांना घातला गंडा! संशयित युवतीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT