कोकण

Kokan Rain Update: रत्नागिरीला पावसाने झोडपले

राजेश कळंबटे

रत्नागिरी : जिल्ह्यात शनिवारी (ता. 13) दिवसभर मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरीला(ratnagiri)तर पावसाने झोडपून काढले. अन्य तालुक्यात संततधार सुरु होती. पावसामुळे रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी पाणी साचून राहीले होते. तालुक्यातील पावस (pavas)परिसरातील सातपर्‍या भरुन वाहत होत. पुराचे पाणी आल्यामुळे कमी उंचीच्या कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतुक ठप्प झाली होती.(ratnagiri-heavy-rain-orange-alert-update-marathi-news)

जिल्ह्यात मागील 24 तासात सरासरी 50.42 मिमी पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड 64.80 मिमी, दापोली 26.50 मिमी, खेड 45.10, गुहागर 47.30 मिमी, चिपळूण 59.20 मिमी, संगमेश्वर 42.00 मिमी, , रत्नागिरी 55.20 मिमी, राजापूर 58.40 मिमी,लांजा 55.30 मिमी पाऊस झाला. रत्नागिरी तालुक्यातील पानवल येथे स्वप्निल अनंत कांबळे त्यांच्या घराचे वादळी वार्‍यामुळे पत्रे उडून अंशतः नुकसान झाले आहे.

हवामान विभागाकडून 15 जुनपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात आज दुपारपर्यंत पावसाचा लवलेशही नव्हती. त्यानंतर वेगवान वार्‍यासह मुसळधार पाऊस सुरु झाला. राजापूर, सगंमेश्‍वर, खेड तालुक्यासह दापोलीत सरी कोसळत होत्या. दिवसभरात काही वेळ ढगाळ वातावरण तर काही वेळ स्वच्छ सूर्यप्रकाश पडलेला होता. मंडणगडात पडलेल्या पावसामुळे भारजा व निवळी नद्या प्रवाहित झाल्या; परंतू पाणी पातळी वाढलेली नव्हती.

चिपळूण शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सकाळपासून दमदार पाऊस झाला; मात्र दुपारनंतर जोर ओसरला. त्यामुळे शिवनदी आणि वाशिष्ठी नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली. रत्नागिरी तालुक्यात सकाळच्या सत्रात कडकडीत उन होते. दुपारनंतर वातावरण बदलले आणि मुसळधार सरींना सुरवात झाली. वेगवान वार्‍यासह धुवाधार पाऊस पडला. अतिवृष्टी पडणार अशीच स्थिती निर्माण झाली होती. दोन तासानंतर जोर ओसरला. काजळी नदीची पाणी पातळी सायंकाळी 12.06 मीटर इतकी होती. ती धोक्याच्या पातळीपेक्षा चार मिटरने कमी होती. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यापासून केवळ २७ प्रमाणपत्रांचं वाटप; सरसकट आरक्षण नाहीच, दिशाभूल कोण करतंय?

Nashik Post : आनंदाची बातमी! टपाल विभागाकडून आता कॅनडा, अमेरिकेतही पोचणार दिवाळी फराळ!

Latest Marathi News Live Update : राजनाथ सिंह यांची पुण्यात डीआरडीओच्या तोफखाना प्रदर्शनाला हजेरी

Health Care: निरोगी आरोग्यासाठी वर्षात दोनदा आरोग्य तपासणी करा, डॉक्टरांचा आरोग्यमंत्र

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस 'ज्ञानोत्सव' म्हणून साजरा!

SCROLL FOR NEXT