ratnagiri khed surgery campaign on england doctor kokan marathi news 
कोकण

परदेशी पाहुण्यांनी दिली भारतीयांना 'ही' सेवा...

सकाळ वृत्तसेवा

खेड (रत्नागिरी) : चिपळूण तालुक्‍यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात इंग्लंडच्या डॉक्‍टरांच्या पथकाकडून शस्त्रक्रिया शिबिर झाले. रुग्णालयात 2006 पासून डॉ. संजय देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी नामवंत ब्रिटिश डॉक्‍टरांचे एक वैद्यकीय पथक सेवाभावी वृत्तीने येत असते. गेली पंधरा वर्षे डॉ. देशपांडे आणि त्यांचे सहकारी अविरतपणे वेळ काढून डेरवण येथे आठ ते दहा दिवसांसाठी सेवाभावीवृत्तीने येथे येऊन शस्त्रक्रिया करतात. यावर्षीचे शिबिर नुकतेच झाले. 

डॉ. संजय देशपांडे यांनी आपले वैद्यकीय शिक्षण औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून पूर्ण केले. एम.डी. (ऍनेस्थेशिया) ही पदवी प्राप्त केल्यावर त्यांनी काही दिवस मुंबई आणि सौदी अरेबिया येथील रुग्णालयात नोकरी केली. त्यानंतर इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी ऍनेस्थेशियामध्ये फेलोशिप पूर्ण केली. नंतर ते साउथ टेनिसाईड NHSFT' येथे सल्लागार म्हणून काम करू लागले. या व्यवसायात जम बसल्यावर समाजसेवा करण्याचे ठरविले. काही काळासाठी मायदेशात परत यायचे आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी वैद्यकीय सेवा द्यायची, असे त्यांचे स्वप्न होते.

भारतात सेवा देण्यासाठी उद्युक्त

डॉ. देशपांडेंशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी सांगितले की, माझे मित्र डॉ. सुनील नाडकर्णी हे पुण्यातील नामवंत अस्थिशल्यविशारद. त्यांनी डेरवणमधील सेवाभावी कार्यांचा परिचय करून दिला. डेरवण येथील सर्व काम पाहून आणि डेरवणच्या श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्टचे प्रमुख अशोकराव जोशी तथा श्री काकामहाराज यांना भेटल्यामुळे तिथे काम करण्यासाठी स्फूर्ती मिळाली. 2006 साली हा प्रकल्प सुरू केला. इंग्लंडच्या ईशान्य भागातील वैद्यकीय व्यावसायिकांना भारतात काम करण्यासाठी उद्युक्त केले.

धर्मादाय न्यासाचीही नोंदणी 
डेरवण रुणालयासाठी उपयुक्त अशी आणि आवश्‍यक अशी अनेक उपकरणे आम्ही इंग्लडहून पाठविली आहेत. 2009 साली श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट, यु. के. या नावाने आम्ही एक धर्मादाय न्यास नोंदविला आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही याठिकाणी गरजूंना मदत उपलब्ध करून देत असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT