Minister Uday Samant esakal
कोकण

रत्नागिरी : टीकेला कामाद्वारे उत्तर देणार- मंत्री सामंत

रत्नागिरीतील रस्ता कामांना प्रारंभ

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : शहरातील खड्डेमय रस्ते हे शिवसेनाच चांगले करू शकते, असा विश्वास सुज्ञ रत्नागिरी जनतेमध्ये आहे. रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली आहे. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर अधिकृतरित्या रस्ते कामांचा प्रारंभ करण्यात येणार आहे. विरोधकांनी सोशल मीडियावर जुने व्हिडीओ टाकण्याचे काम सुरूच ठेवावे. त्यांच्या टीकेला कामाच्या माध्यमातून उत्तर दिले जाईल, असा चिमटा उच्च व तंत्रशिक्षमंत्री उदय सामंत यांनी विरोधकांना काढला.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होत़े. रत्नागिरीत रस्त्यांच्या कामाला रविवारपासून (ता. १०) सुरवात झाली. १५ ऑक्टोबरला कोकणनगर, मारूती मंदिर, लक्ष्मीचौक येथील कामांचा शुभारंभ होईल़.

एकूण ३२ कोटी रूपये शहरातील रस्ते कामांसाठी मंजूर करण्यात आले आहेत़. साळवी स्टॉप ते दांडा फिशरीज येथील मुख्य रस्त्यांवर देखील खड्डयांच्या पॅचिंगचे काम करण्यात येत आहे.

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे महिन्याच्या अखेरीस रत्नागिरीत येणार आह़े. त्याच्या हस्ते पालिकेच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन कार्यक्रम होणार आहे. उत्तरप्रदेशच्या लखीमपूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून पुकारण्यात आलेल्या बंदला रत्नागिरीच्या जनतेने चांगला प्रतिसाद दिला. त्याबद्दल येथील व्यापारी व रहिवाशांचे शिवसेना पक्षाचा उपनेता म्हणून आभार व्यक्त करतो.

- उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP जॉइन करा अन् दर महिन्याला 50 हजार कमवा! असा मेसेज सगळीकडे का होतोय व्हायरल? यामागचा स्कॅम पाहून बसेल धक्का

Pune Riksha Fare: पुणेकरांना मोठा झटका! रिक्षाभाडेवाढीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; लवकरच नवे दर हाेणार लागू

Almatti Dam Controversy : आलमट्टीच्या उंचीवरून कर्नाटकची मनमानी! महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावे; तज्ज्ञांचं आवाहन, काय म्हणाले केंगार?

Child Murder Case: एआयच्या मदतीने चिमुकल्याची हत्या! बिश्नोई गँगच्या नावाने १९९ रुपयांत सिमकार्ड खरेदी; कसा रचला भयानक कट?

Mumbai News: ना नोटीस, ना आदेश! जन्म-मृत्यू दाखल्यांच्या दुरुस्तीचे काम ठप्प, शाळा-कॉलेज प्रवेशासाठी धडपडणारे विद्यार्थी संकटात

SCROLL FOR NEXT