ST Workers Strike sakal media
कोकण

St Worker Strike Ratnagiri : एसटीचे २०३ कर्मचारी कामावर हजर

निलंबन टळणार; काही फेऱ्या सोडल्याने प्रवाशांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : परिवहन मंत्र्यांनी पगारवाढीची घोषणा करूनही एसटी कर्मचारी काम बंद आंदोलनावर ठाम आहेत. परंतु आज जिल्ह्यात २०३ कर्मचारी कामावर हजर होते. त्यामुळे कार्यालय आणि चार आगारांतून फेऱ्या सुरू झाल्या आणि प्रवाशांना अल्प दिलासा मिळाला. जिल्ह्यात ९ फेऱ्या सोडण्यात आल्या. परिवहन मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे निलंबित कर्मचारीही हजर होऊ लागल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई टळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात आज ता. २५ रोजी देवरूख, राजापूर आणि चिपळूण आगारातून काही फेऱ्या सोडण्यात आल्या. काल १५० कर्मचारी कामावर हजर झाले होते. आज त्यात सुमारे पन्नास कर्मचाऱ्यांची भर पडली. काल परिवहन मंत्र्यांनी आज कामावर हजर झालेल्या कर्मचाऱ्यांचे निलंबन रद्द करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे निलंबित केलेले काही कर्मचारी आज हजर झाल्याचे समजते. अनेक कर्मचारी उद्या हजर होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी एसटी विभागातील १०८ कर्मचाऱ्यांचे निलंबन केले असून ३१ जणांची सेवा समाप्त केली. सलग १८ व्या दिवशी आंदोलन सुरू आहे. काल मंत्र्यांनी वेतनवाढीची घोषणा करूनही कर्मचारी विलिनीकरणावर ठाम आहेत. दरम्यान, आज आमदार गोपिचंद पडळकर, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनातून माघार घेतली. मुंबईतून वकील गुणरत्न सदावर्ते आणि संघटनांच्या नेत्यांकडून येणाऱ्या आदेशानंतरच येथील कर्मचारी पुढील निर्णय घेणार आहेत.

आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार

रत्नागिरीतील एसटी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार केला आहे. याबाबत कर्मचाऱ्यांनी सांगितले की, शासनात विलिनीकरणाच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. काल मंत्र्यांनी केलेल्या घोषणा फक्त राजकीय आहेत.

४ हजार ६८ अजूनही गैरहजर

प्रशासकीय १२९, कार्यशाळा ६३, चालक ८, वाहक ३ असे एकूण २०३3 कर्मचारी कामावर हजर झाले. सध्या प्रत्यक्ष संपामध्ये प्रशासकीय ३७२, कार्यशाळा ५६८, चालक २ हजार ३६२, वाहक ७६६ असे एकूण ४०६८ कर्मचारी सहभागी झाले आहेत. उद्यापासून मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर हजर होतील, असा विश्वास एसटीच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

एक नजर..

कर्मचाऱ्यांचे निलंबनः १०८

सेवा समाप्तः ३१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : अमित ठाकरे सपत्नीक वरळी डोममध्ये पोहचले; राज अन् उद्धव ठाकरेही रवाना

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

Anil Parab : मनसे-ठाकरे गटाची युती होणार? अनिल परब यांचं सूचक वक्तव्य; म्हणाले, 'आजचा हा मेळावा म्हणजे...'

Marathi Bhasha Vijay Melava : मुंबईत राजकीय वातावरण तापलं, दादरमध्ये मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात...

Asaduddin Owaisi: ओवेसींच्या एमआयएमने बिहार महाआघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त

SCROLL FOR NEXT