ratnagiri municipal corporation
ratnagiri municipal corporation 
कोकण

रत्नागिरीत गाळे सील करण्याचा उडाला फज्जा

राजेश शेळके

रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिर येथील गाळे सील करण्यावरून पालिका प्रशासनाचा अंधारात भूई धोपटण्याचा प्रकार पुढे आला. सकाळी साडेअकरा वाजता कारवाईसाठी गेलेल्या मालमत्ता विभागाचे कर्मचारी पोलिस संरक्षण मिळण्यापूर्वीच घटनास्थळी दाखल झाले. गाळेधारकांनी विषय ताणून धरल्यानंतर नरमाईची भूमिका घेतली अन् हात हलवत परतले. त्यामुळे गाळे सील करण्याचा असा फज्जा उडाला.

पालिकेच्या मालमत्ता विभागाचे कर्मचारी सकाळी साडेअकरा ते बारा वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर येथील गाळेधारकांकडे गेले. आम्ही गाळा सील करण्यासाठी आलो आहोत, असे स्पष्ट करीत दुकानदारांना गाळे खाली करण्यास सांगितले. परंतु, गाळेधारकांनी आवाज चढविल्यानंतर पालिकेचे कर्मचारी नरमले. आम्हाला आधी नोटीस का दिली नाही, ताब्यात घेण्याबाबत न्यायालयाचा आदेश आहे का? असे अनेक प्रश्‍न उपस्थित केले. त्यानंतर तेज कुरिअरच्या दुसर्‍या गाळ्यात जाऊन मालमत्ता विभागाच्या कर्मचार्‍यांनी कागदी घोडे नाचवत पंचनामे सुरू केले; मात्र गाळे सील करण्याबाबत गाळे मालकांना खडसावून सांगण्याचे धाडस झाले नाही.

पालिकेच्या मालकीचे छत्रपती शिवाजी क्रीडांगण येथील 11 गाळ्यांची मुदत संपल्याने ते ताब्यात घेण्यावरून विषय सुरू आहे. मुदत संपली तरी हे गाळे ताब्यात घेण्यात आले नव्हते. सभागृहात ही बाब पुढे आल्यानंतर यंत्रणा कामाला लागली. पालिकेने गाळे ताब्यात घेण्याची हालचाल सुरू केली. गाळेधारकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली तसेच नगरविकास मंत्रालयाकडे मुदतवाढीसाठी याचना केली. उच्च न्यायालयाने पालिकेची बाजू मान्य करीत 4 आठवड्यात निर्णय घेऊन दोन महिन्यात प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितले. पालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली. ही निविदा प्रक्रिया स्थगित करण्यासाठी रत्नागिरी येथील दिवाणी न्यायालयात अर्ज केला. दिवाणी न्यायालयाने निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यास नकार दिल्यामुळे पालिकेने गाळे ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला; मात्र प्रशासनाकडून कारवाईचा केवळ फार्स झाला.

पोलिसांना पालिकेने फक्त पत्र दिले

पोलिस संरक्षणात हे गाळे सील करण्याचे आदेश होते. पोलिसांना पालिकेने फक्त पत्र दिले. अपेक्षित न्यायालयाच्या आदेशापासून अन्य कागदपत्रे दिली नव्हती. त्यामुळे पोलिस संरक्षण देण्यास पोलिसांनी दिरंगाई केली. दुपारनंतर काही कागदपत्रे दिली; मात्र पोलिस अधीक्षकांचा आदेश नसल्याने पालिकेला सायंकाळी उशिरापर्यंत बंदोबस्त मिळालाच नाही. अखेर मालमत्ता विभागाचे पथक हात हालवत परतले.

 
संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT