कोकण

रत्नागिरीत बारावी विद्यार्थ्यांसाठी मोफत रिक्षा सेवा

प्रमोद हर्डीकर

साडवली - बारावी परीक्षेला जाणार्‍या विद्यार्थ्यांना वेळेत पोचण्याचे बंधन बोर्डाने घातले आहे. मुलांचा वाहतुक कोंडीत वेळ जावू नये म्हणुन रत्नागिरी शिरगाव येथील सेवाभावी रिक्षा व्यावसायिकांनी नवाच फंडा शोधून काढला. शिरगाव वाहतुक कोंडीत अडकल्यास विद्यार्थ्यांनी फोन करावा, त्यांना परीक्षा केंद्रात मोफत सोडण्यात येईल, असे सोशल मिडीयावर तसेच त्या भागात बॅनर लावून जाहीर करण्यात आले आहे.

सेवाभावी रिक्षा व्यावसायिक सुबहान तांबोळी, फारुक तांबोळी, करीम मुजावर, करीम तांबोळी, गणेश भरणकर, परेश कुमटेकर, शुभम शिंदे यांनी हा उपक्रम जाहीर केला आहे. या नविन सेवेमुळे या रिक्षा व्यावसाईकांचे कौतुक होत आहे. मुलांसाठी मोफत सेवा देऊन एक चांगले काम या लोकांनी केले आहे. आज (बुधवारी) पहील्याच पेपरला दोन मुलींनी फोन करुन ही सेवा अनुभवली. या दोन मुलींना परीक्षा केंद्रावर वेळेत सोडण्यात आले.

गेल्यावर्षीही या उपक्रमाचा चाळीस मुलांनी लाभ घेतला. यावर्षी मुलांची संख्या वाढल्यास गैरसोय होवू नये, यासाठी ६ रिक्षा आणि दोन सुमो तयार ठेवण्यात आले आहेत.

- सुबहान तांबोळी

या उपक्रमाची माहिती वाहतुक पोलीसांनाही देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला अडचण आल्यास तात्काळ ती सोडवली जात आहे. रिक्षा व्यावसायीकांचे या उपक्रमामुळे अभिनंदन होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

SCROLL FOR NEXT