कोकण

राज्यात कोकण बोर्डच अव्वल

राजेश कळंबटे

रत्नागिरी - माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेत कोकणाने राज्यात अव्वल राहण्याची परंपरा सलग सातव्या वर्षी कायम ठेवली. कोकणाचा निकाल 94.85 टक्के लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली. त्यात रत्नागिरी जिल्ह्याचा 94.22 टक्के तर सिंधुदुर्गचा 96 टक्के निकाल आहे, अशी माहिती बोर्डाच्या सहसचिव श्रीमती भावना राजनोर यांनी पत्रकार परिषद दिली.

कुवारबाव येथील मंडळाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर उपस्थित होते. रत्नागिरी, सिंधुुदुर्ग जिल्ह्यातील 33 हजार 69 विद्यार्थी बसले होते. त्यातील 31 हजार 336 उत्तीर्ण झाले. 2012 ला कोकण मंडळाची स्थापना झाली. त्यानंतर यश कायम आहे. यावर्षी 16,979 मुलांपैकी 15,737 तर 16,060 मुलींपैकी 15,599 उत्तीर्ण झाल्या. 4.44 टक्के अधिक मुली पास झाल्या. मराठीचा निकाल 99.35, इंग्रजीचा 95.20, हिंदी 98.48, गणित 97.5, अर्थशास्त्र 97.48, अकाउंट 98.32, भौतिकशास्त्र 98.73, रसायानशास्त्र 99.45 तर जीवशास्त्र 99.26 टक्के.

जिल्हा      शाखा    बसलेले विद्यार्थी    उत्तीर्ण     टक्के
* रत्नागिरी    विज्ञान       5,495       5,315   97.38
                 कला         6,188      5,395    87.18
                 वाणिज्य     9,122       8,844    96.95
                एमसीव्हीसी     615          592    96.26         
---------------------------------------------
                   एकूण      21420      20182   94.26 
-----------------------------------------------
* सिंधुदुर्ग     विज्ञान       2,846       2,820     99.09
                 कला        2,825       2,574     91.2      
                 वाणिज्य     4,893       4,831     98.73
                एमसीव्हीसी   1,055         929     88.06
---------------------------------------------
                              11,621     11,154    96.00
------------------------------------------------
कॉपी करणार्‍यांवर कारवाई
परीक्षेमध्ये दोन विद्यार्थी कॉपी करताना सापडले. त्यांच्यावर एक परिक्षा बंदीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना जुलै महिन्यात होणार्‍या पुरवणी परीक्षेला बसता येणार नाही.

“मुलांची संख्या कमी असली तरीही गुणवत्ता आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांची मागणी असेल तर कोकण विद्यापीठ होऊ शकते.”
- भावना राजनोर,
सहसचिव
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT