कोकण

डॉ. माधवी साठेंनी मिळविले ७७ व्या वर्षीही ५ सुवर्णपदके

सकाळवृत्तसेवा

गुहागर - वयाच्या ७७ व्या वर्षी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत ४ वैयक्तिक आणि १ सांघिक सुवर्णपदक जिंकून चिपळूणमधील डॉ. माधवी साठे यांनी तरुणींनाही लाजविले आहे.

महाविद्यालयात असताना अपघाताने त्या पोहायला शिकल्या, मात्र त्यानंतर पाण्यातच रमण्याची त्यांची आवड आणि त्यातून मिळणारी पदके हा प्रवास थक्क करणारा आहे. वयाच्या ६५ व्या वर्षी जलतरण क्रीडा स्पर्धांत भाग घ्यावा आणि पराक्रम करावा, असे वाटल्याने २००५ ला त्यांनी स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरवात केली. १२ वर्षांच्या या काळात त्यांनी ३० पदके मिळविली आहेत.

१९६० ला अहमदनगरला बालिकाश्रमात राहून त्या आयुर्वेद महाविद्यालयात शिकल्या. बालिकाश्रमाच्या प्रमुख माणिकताई करंदीकर यांच्या मुलीला पोहोण्याची आवड होती. तिला सोबत म्हणून जात असताना डॉ. माधवी पोहायला शिकल्या. आवड वाढत गेली. ५ वर्ष शिक्षण घेताना पोहण्याचा सराव झाला. सातारा जिल्ह्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना पोहणे थांबले. विवाहानंतर त्या चिपळुणात आल्या. त्यांनी घाणेकर हॉस्पिटलमध्ये नोकरी आणि नंतर स्वतंत्र वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. संसार, मुले, व्यवसाय अशा व्यापात पोहोण्याचा छंद जोपासता आला नाही. कधीतरी तेही पावसात पोहायला जात असत.

२००४ ला चिपळूण पालिकेने रामतीर्थ जलतरण तलाव बांधला. तेथे डॉ. माधवी यांच्या छंदाला धुमारे फुटले. याच काळात अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे महाराष्ट्र राज्य व्हेट्रन्स ॲक्वाटिक असोसिएशनने सर्व वयोगटांसाठी राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा आयोजित केली. तेथे त्यांनी पहिले पदक मिळविले आणि मग जलतरण स्पर्धा म्हणजे चिपळूणच्या डॉ. साठे व हमखास पदक असे समीकरण जमले. डॉ. माधवींनी अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत पदके मिळवली.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भाग घेण्याची माझी इच्छा आहे. मात्र सोबतीला सहकारी हवा. तेथील निवास व प्रवासाचा होणारा खर्च, प्रवास यावयात झेपला पाहिजे. या साऱ्यामुळे सध्या गणित जुळत नाही.
- डॉ. माधवी साठे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT