ratnagiri police action on who people Out for walking 
कोकण

वॉकींगसाठी बाहेर पडताय! पोलिसांनी उचलले हे पाऊल

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : लॉकडाऊन असतानाही काही लोक वेगवेगळ्या कारणांमुळे  घराबाहेर पडत आहेत. त्यात इव्हिनिंग वॉकच्या निमित्ताने बाहेर पडणाऱ्या लोकांना पोलिसांनी चांगलाच दणका दिला असून मैदानावर आलेल्या काहींना तिथेच बसवून ठेवण्यात आले आहे.

घराबाहेर पडू नये असे पोलिसांनी आणि प्रशासनाने आवाहन करूनही नागरिक संध्याकाळच्या वेळेत वॉकींगसाठी बाहेर पडू लागले आहेत. गुरुवारी मात्र रत्नागिरी पोलिसांनी या वॉक करणाऱ्यांना चांगली अद्दल घडविली. रत्नागिरी शहरातील मारुती मंदिरच्या शिवाजी स्टेडियमच्या मैदानात वॉक करणाऱ्या नागरिकांना तासभर मैदानातच बसून ठेवले. त्यामुळे या सगळ्यांची चांगलीच कोंडी झाली. प्रशासन वारंवार सांगून लोक ऐकत नसल्याने पोलिसांनी अखेर ही कारवाई केली.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदीचे काटेकोर पालन सुरू होते. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांना पोलिसांच्या बांबूचे फटके खावे लागले तर काहींना चांगलाच फाईन भरावा लागला. यामुळे संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू होती. मात्र अत्यावश्यक सेवांसाठी पास दिल्यानंतर रस्त्यांवर वर्दळ वाढली. पासधारक वाढल्याने पोलिसांनीही थोडी उसंत घेतली आणि विनाकारण बाहेर पडणाऱ्याचे फावले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT