Ratnagiri Rain Kelshi Village esakal
कोकण

Ratnagiri Rain : गेल्या 50 वर्षांत प्रथमच 'या' गावात मोठा पाऊस; ढगफुटीसदृशस्थिती, जनजीवन विस्कळीत

अनेक घरांमध्ये पाणी भरल्याने ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन राहिले होते.

राधेश लिंगायत

गेल्या ५० वर्षांमध्ये कधीच एवढा पाऊस पडला नव्हता, असे येथील ज्येष्ठ ग्रामस्थांनी सांगितले.

हर्णै : गेले दोन दिवस सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे (Ratnagiri Rain) दापोली तालुक्यातील केळशी गावामध्ये (Kelshi Dapoli) पाणीच पाणी झाले होते. जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले होते. रविवारी (ता. १) रात्री उशिरा पाऊस थांबल्यानंतर गावात शिरलेले पाणी ओसरले. त्यामुळे गावातील जनजीवन पूर्वपदावर आले असून, महसूल विभागाने पंचनाम्यांना सुरवात केली आहे.

गेल्या ५० वर्षात कधीच एवढा पाऊस पडला नव्हता, असे येथील ज्येष्ठ ग्रामस्थांनी सांगितले. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हवामान खात्याने दोन सतत अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्याचा जोरदार फटका दापोली तालुक्यातील केळशी गावाला बसला. संपूर्ण गावामध्ये पाणीच पाणी झाले होते. ३० सप्टेंबरला सायंकाळी ५ वा. रिमझिम पाऊस सुरू झाला तो १ ऑक्टोबरला रात्री थांबला.

गेल्या ५० वर्षांमध्ये कधीच एवढा पाऊस पडला नव्हता, असे येथील ज्येष्ठ ग्रामस्थांनी सांगितले. केळशी बाजारपेठ, आखवेवाडी, रथआळी, कुंभारवाडा, आदी परिसरामध्ये पाणीच पाणी झाले होते. कुंभारवाडा आणि भाट परिसर उंचावर आहे. यापूर्वी अनेकवेळा अतिवृष्टी झाली; पण कधीच पाणी भरले नव्हते, अशा ठिकाणीही रविवारी पाणी भरले.

अनेक घरांमध्ये पाणी भरल्याने ग्रामस्थ जीव मुठीत घेऊन राहिले होते. रविवारी रात्रभर पाऊस पडला असता तर येथील सर्वच घरांत पाणी शिरले असते; परंतु वरूणराजाने कृपा केल्याने सोमवारी सकाळी गावातील सर्व पाणी ओसरले आणि पुन्हा केळशीवासीयांचे जनजीवन पूर्वपदावर आले. ग्रामस्थांनी मिळेल त्या साहित्याने घरातील पाणी बाहेर काढून घरांची साफसफाई केली. श्री सदस्यांनी गावातील साफसफाईसाठी धाव घेतली होती.

रविवारी रात्री तहसीलदार आणि त्यांच्याबरोबर आपत्कालीन टीम हजर झाली. त्यांनी मदतीचे सर्व सामान आणले होते. रात्रीच पाहणी करून तहसीलदारांनी तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. पुढील दोन दिवसात किती नुकसान झाले आहे याची खात्रीशीर माहिती मिळेल, असे तहसीलदार अर्चना बोंबे-घोलप यांनी सांगितले. गटविकास अधिकारी आर. एम. दिघे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

निसर्ग चक्रीवादळात जी भलीमोठी झाडे पडून नाले तुंबले होते, त्या नाल्यांची व्यवस्थित साफसफाई झाली नाही. त्यामुळे ही परिस्थिती ओढवली असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. ग्रामपंचायतीने लवकरात लवकर हे नाले पुन्हा साफ करून घेणे गरजेचे आहे.

-जीवन सुर्वे, शिक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

Aurangabad Murder Case : काकाच्या प्रेमात पडलेल्या महिलेने ४० लाख अन् प्लॉट हडपण्यासाठी काढला पतीचा काटा!

IND vs ENG 2nd Test: इंग्लंडच्या खेळाडूने रिषभ पंतला दाखवलं 'आमिष'; आपल्या पठ्ठ्याने काय उत्तर दिले पाहा, Viral Video

SCROLL FOR NEXT