Bhuibawada Ghat on Kharepatan Gaganbawda Route esakal
कोकण

Bhuibawada Ghat : खारेपाटण-गगनबावडा मार्गावरील भुईबावडा घाटात कोसळल्या दरडी; वाहतूक काही काळ ठप्प

तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच असून संततधारेमुळे भुईबावडा घाटात दरड कोसळली.

सकाळ डिजिटल टीम

दरड कोसळल्याचे समजताच बांधकाम विभागाचे कर्मचारी जेसीबी घेऊन घाटात पोहोचले. त्यांनी अवघ्या अर्ध्या तासात रस्ता वाहतुकीस खुला केला.

वैभववाडी : तालुक्यात मुसळधार पाऊस सुरूच असून संततधारेमुळे भुईबावडा घाटात दरड कोसळली. त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली. पावसामुळे तालुक्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. भुईबावडा, तिरवडेमधील लहान पुलावरून पुराचे पाणी वाहत आहे.

तालुक्यात पावसाची नोंद १२० मिलीमीटर इतकी झाली आहे. पावसामुळे खारेपाटण - गगनबावडा मार्गावरील (Gaganbawda Road) भुईबावडा घाटात (Bhuibawada Ghat) दरड कोसळली. दरडीचा अधिकत्तर भाग गटारात कोसळला असला तरी काही दगड रस्त्यावर कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली.

दरड कोसळल्याचे समजताच बांधकाम विभागाचे कर्मचारी जेसीबी घेऊन घाटात पोहोचले. त्यांनी अवघ्या अर्ध्या तासात रस्ता वाहतुकीस खुला केला. याशिवाय, घाटमार्गात अन्य काही ठिकाणी देखील छोटे मोठे दगड रस्त्यावर कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत.तळेरे-कोल्हापूर महामार्गावरील करूळ घाटात देखील काही दगड रस्त्याकडेला कोसळले. मात्र, त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही.

तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे तालुक्यातील शुक, शांती, अरूणा, कुसुर, करूळ, गोठणा या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. भुईबावडा परिसरात पावसाचा जोर अधिक असून या गावातील घाणेगडवाडी येथील लहान पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे येथील वाहतूक ठप्प झाली आहे. याशिवाय तिरवडे येथे देखील कॉजवेवरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT