कोकण

रत्नागिरी : रस्ता भूमिपूजनप्रसंगी शिवसेना - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची

सकाळ वृत्तसेवा

मंडणगड - तालुक्‍यातील चिंचघर येथे रस्त्याचे भूमिपूजन करण्यासाठी आलेल्या मंत्र्यांच्या ताफ्याला राष्ट्रवादीतर्फे काळे निशाण दाखविले. यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत विरोध केला. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची होऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्काबुक्की करत हुसकावून लावण्यात आले. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण आटोक्‍यात आणले. यानंतर आमदार संजय कदम मंडणगडात दाखल झाले. त्यांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. 

विधानसभा क्षेत्राध्यक्ष प्रकाश शिगवण, तालुका अध्यक्ष अनिल रटाटे, उपाध्यक्ष बशीर मसुरकर यांनी जोरदार निषेध केला. चिंचघर-जावळे-आंबवली-साखरी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला आहे. त्याचे भूमिपूजन करण्यासाठी पालकमंत्री वायकर, रामदास कदम चिंचघर येथे आले. या वेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध केला. स्थानिक आमदार संजय कदम यांनी या रस्त्याचे आधीच भूमिपूजन केले असून कामही सुरू झाले आहे, असे राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. आक्रमक झालेल्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीसह धक्काबुक्की केली. पोलिसांनी दोन्ही बाजूकडील कार्यकर्त्यांना शांत केले. मात्र या सर्व घटनेमुळे वातावरण तणावग्रस्त बनले. यानंतर भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. पालकमंत्री वायकर यांनी मी अध्यक्ष असल्यामुळे नियमानुसार याचे भूमिपूजन करीत असल्याचे सांगितले मात्र राजकीय राडा झाला. 

तक्रार दाखल करण्यात येणार 
याबाबत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अनिल रटाटे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी पालकमंत्र्यांशी चर्चा करीत असताना सेनेचे कार्यकर्ते अंगावर धावून आले. यात प्रकाश शिगवण यांना मारहाण केली. याबाबत पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. आमदार संजय कदम पोलिस ठाण्यात दाखल झाल्यावर प्रक्रिया सुरू होती. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश; जनता वसाहत टीडीआर प्रकरणाला शासनाची स्थगिती

Miraj Minor Ganja : झटपट पैसे मिळवण्याचा नाद बेक्कार! मिसरुट न फुटलेली पोरंही गांजा विकताहेत; मिरजेत अल्पवयीनांकडून दोन किलो गांजा जप्त

Umesh Patil: स्वबळ ठरलेच तर शिवसेनेसह इतरांना सोबत घेऊ: राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष उमेश पाटील; सामान्य नागरिक, कार्यकर्ता राष्ट्रवादीसोबतच..

Nilesh Ghaywal Case : निलेश घायवळ प्रकरणात आता ईडीची एन्ट्री; जमीन व्यवहारातील कोट्यवधींच्या उलाढालीचा तपास होण्याची शक्यता

Karnataka Politics : कर्नाटकात काँग्रेस सरकार संकटात? 'नोव्हेंबर क्रांती'च्या चर्चांना वेग, डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार?

SCROLL FOR NEXT