rain e sakal
कोकण

कोकणाला 2 दिवस रेड अलर्ट ; 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा

राजेश कळंबटे/

रत्नागिरी : गेले सहा दिवस झाले रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यास पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. बहुतांश सखल भागात पाणी साचल्याने ग्रामस्थांना त्रास झाला. काही भागातील भात शेती देखील पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे. पावसाचा जोर कमी असल्याने आता सखल भागातील पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे. (ratnagiri-sindhudurg-red-alert-warning-24-hours-heavy-rain-konkan-rain-update-akb84)

दरम्यान पुढील 24 तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे कोकणातील शेतकरी भात शेतीचे नुकसान होईल की काय या चिंतेत पडले आहेत. सततच्या पडणा-या पावसामुळे रत्नागिरी तालुक्यातील प्रसिद्ध अशा पावसमधील सखल भागात देखील पाणी शिरलं होते. गौतमी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. परिणामी, समाधी मार्गावरील सखल भागात पाणी शिरलं. मुसळधार पावसानं गौतमी नदी ओसंडून वाहत आहे. सध्या पावसानं उसंत घेतली असून सखल भागातील पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे.

सध्या रिमझिम स्वरूपाचा जिल्ह्याच्या काही भागात पाहायला मिळत आहे. फुणगूस येथील शास्त्री खाडीने नेहमीच्या पाण्याची पातळी ओलांडल्याने खाडीपट्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण खाडीभागाला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. खाडीलगत असलेल्या दहा ते बारा गावातील भात शेतीत पाणी शिरल्याने शेतकऱ्यांना शेतीचे कामे अर्धवट सोडून घरचा मार्ग पत्करावा लागला आहे.शेतात काढून ठेवलेल्या भाताची रोपं शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर वाहून गेलीत. फुणगूस बाजारपेठेत सुमारे तीन ते चार फूट पाणी होते. दत्तमंदिर नदीला ही मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येऊन तेथील घराजवळ व भातशेतीत पाणी घुसले होते. संपूर्ण जनजीवनच विस्कळीत होते. आता पाऊस कमी झाल्यानं पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे.

रत्नागिरी तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे टेंभेपूल भागातील सखल भागात पाणी शिरले आहे. पावसामुळे काजळी नदीला पूर आला आहे. नदीचं पाणी आसपासच्या सखल भागात शिरले आहे. यावेळी टेंभेपूल भागातील समाजमंदिर भागापर्यंत पाणी शिरलं होतं. सध्या पावसानं विश्रांती घेतली असून नदीचा पूर ओसरला असून सखल भागात साचलेलं पाणी देखील आता ओसरायला सुरूवात झाली आहे.

कोकणाला पुढील 2 दिवस रेड अलर्ट

कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. येथे पडणाऱ्या सततच्या पावसाने कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्ग, देवगड, वैभववाडी या भागात पावसामुळे पाणी साचले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1323.91 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पावसाचा जोर असाच राहिल्यास परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे.रत्नागिरी जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. पुढील 2 दिवस रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT