ratnagiri vaibhavwadi seven Corporator entry in shiv sena 
कोकण

कोकणात भाजपला धक्का ; सहा नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी - वाभवे वैभववाडी नगरपंचायतीतील भाजपाच्या सहा नगरसेवकांनी आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर प्रवेश होताच येथील शिवसैनिकांनी बाजारपेठेत फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोष केला. निवडणुकीच्या तोंडावर हा शिवसेनेने भाजपाला दिलेला जोरदार धक्का दिला आहे. 

या पक्षप्रवेशामुळे वैभववाडीसह जिल्हयातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. प्रवेश केलेल्यांमध्ये तीन माजी नगराध्यक्ष आणि एका उपनगराध्यक्षांचा समावेश आहे.

वाभवे वैभववाडी नगरपंचायतीतील भाजपचे काही नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यापांसून वैभववाडीत सुरू होती. त्यातच नगरपंचायत आरक्षण सोडतीत अनेकांचे प्रभाग आरक्षित झाले असल्यामुळे नव्या प्रभागाच्या शोधात ते होते. त्यातून पक्षातर्गंत धुसफुस वाढली होती. शहरातील काही कार्यकर्त्यामध्ये दोनदा धक्काबुक्कीचे प्रकार झाले होते. 

दरम्यान, सोमवारी नगरपंचायतीच्या सात नगरसेवक आणि तीन पदाधिकाऱ्यांनी भाजपाच्या पक्षसदस्त्वाचा राजीनामा तालुकाध्यक्ष नासीर काझी यांच्याकडे दिला होता. त्यावेळीपासून ते शिवसेनेत प्रवेश करणार या चर्चेला उधाण आले होते. आज सायकांळी या चर्चेला पुर्णविराम मिळाला. 

आज सायकांळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मातोश्रीवर माजी नगराध्यक्ष रवींद्र रावराणे, माजी नगराध्यक्ष संजय चव्हाण, माजी नगराध्यक्ष दीपा गजोबार, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र तांबे, संतोष पवार, स्वप्निल ईस्वलकर यांनी शिवबंधन बांधून घेतले.

यावेळी पालकमंत्री उदय सांमत, उद्योगमंत्री सुभाष देसाई, शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर, अरूण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत, अतुल रावराणे, संदेश पारकर, मंगेश लोके, आदी उपस्थित होते.

वैभववाडी शहराचा अपेक्षित विकास होत नव्हता म्हणून आपण विकास प्रकियेत सामील होत आहोत.अशी प्रतिक्रिया प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी व्यक्त केली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेने वैभववाडीत भाजपाला जोरदार धक्का दिला आहे. प्रवेश केलेले सर्व नगरसेवक स्थानिक असून त्यांचा त्यांच्या प्रभागामध्ये चांगला प्रभाव आहे.

 वैभववाडीच्या नळपाणी योजनेसाठी १४ कोटीचा निधी,

प्रवेश केल्यानंतर नगरसेवकांनी शहरातील पाण्याचा प्रश्न मुख्यमंत्र्याकडे  उपस्थित केला. यावेळी नळपाणी योजनेसाठी १४ कोटी रूपयाचा निधी देण्याचे मान्य केले. पालकमंत्री उदय सामंत आणि ग्रामीण पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना वैभववाडीत जाऊन प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली.

 संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Bhavan Clash: वाद नेत्यांमध्ये, पण भिडले कट्टर कार्यकर्ते! पडळकरांचा मारहाण करणारा आणि आव्हाडांचा मारहाण झालेला कार्यकर्ता कोण?

Uddhav Thackeray targets Devendra Fadnavis: ‘’...तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक, मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात’’ ; उद्धव ठाकरे कडाडले!

ENG vs IND : रिषभ पंतकडून प्रेरणा घेत भारताच्या महिला क्रिकेटरनेही एकाहाताने मारला 'सुपर सिक्स', Video Viral

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

SCROLL FOR NEXT