Covid-19-Updates 
कोकण

रत्नागिरीत का वाढतो कोरोना? ही आहेत कारणे

- राजेश शेळके

रत्नागिरी: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अधिक प्रभाव राहणाऱ्या राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा समावेश कायम आहे. नागरिक स्वतःहून पुढे आले नाहीत तर दुसरी लाट नियंत्रणात येणे कठीण आहे. स्वॅब दिला की अहवाल येईपर्यंत आयसोलेट होणे गरजेचे आहे; मात्र तसे होत नाही. सौम्य लक्षणे असलेले अनेक होम आयसोलेट होतात, परंतु निर्बंध पाळत नाहीत. फिरत राहतात आणि संसर्ग वाढवत आहेत. यापूर्वी प्रशासनाकडुन शिक्के मारणे, कारवाई करणे हे होत होतं; मात्र ही जबाबदारी फक्त आरोग्य विभाग आणि प्रशासनाचीच आहे का? नागरिकांची काही जबाबदारी नाही का? नागरिकांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यात संसर्ग वाढतो त्याचे खापर आमच्यावर फोडले जाते, अशी उद्विग्न प्रतिक्रिया जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिली.(ratnagiri-why-corona-growth-in-information-district-surgeon-dr-sanghamitra-fule-covid-19-update)

जिल्ह्यातील बाधितांची संख्या काही कमी होण्याचे नाव घेईना. त्यावर निर्बंध पाळले नाही तर परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे अवघड होईल, असा इशारा त्यांनी दिला. दिवसाला ४०० ते ५०० या दरम्यान बाधित मिळत आहेत. चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची टक्केवारी नगण्य आहे. होम आयसेलेशनमध्ये असलेले निर्बंधांना फाटा देत आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग आणि प्रशासन आपल्या बाजूंनी सर्व प्रयत्न करीत असले तरी नागरिकांचीही जबाबदारी आहे; मात्र त्यांच्या उदासीनतेमुळे जिल्ह्यातील संसर्ग आटोक्यात येत नसल्याचे मत आरोग्य विभागाने व्यक्त केले.

दुसऱ्या लाटेचा प्रभाव या जिल्ह्यांमध्ये कायम आहे, असे राज्य कृतिदलाकडुन सांगण्यात आले. याची काही प्रमुख कारणे देखील त्यांनी स्पष्ट केली आहेत. कोरोना चाचण्यांमध्ये झालेली मोठी घट, बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) कमी प्रमाणात होणारी तपासणी, कोरोना प्रतिबंध नियमांचे होणारे उल्लंघन या प्रमुख आणि गांभीर्याने न घेतलेल्या कारणांमुळे आठ जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या लाटेचा प्रभाव कायम आहे, अशी निरीक्षणे कृति दलाने वर्तविली आहेत.

याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, आरोग्य विभाग आणि प्रशानस आपल्या बाजूने सर्व प्रयत्न करीत आहेत; मात्र लोक ऐकत नाहीत. कोरोना चाचणीसाठी लोक पुढे येत नाहीत. शिर्के हायस्कूल केंद्रावर चाचणीसाठी रांगा लागत होत्या. आता तिथे कोण येत नाही. शेतीच्या कामाला लोकं लागली आहेत; मात्र यात समाजाचेच नुकसान आहे.

एकूण बाधित -६६ हजार ८०८

* एकूण कोरोनामुक्त -६० हजार ९०९

* बाधित बरे होण्याचा प्रमाण - ९१.१७

* गृह विलगीकरणात- १ हजार ६२४ जणं

*संस्थात्मक विलगीकरणात- २ हजार ३१ जणं

* एकूण मृतांची संख्या -१ हजार ९०५

* मृत्यूदर -२.८५ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT