Record rainfall in Amboli again this year 
कोकण

आंबोलीत यंदाही विक्रमी पाऊस 

अनिल चव्हाण

आंबोली (सिंधुदुर्ग) - यावर्षी आंबोलीत 425 इंच पाऊस झाला आहे. गेल्या वर्षी 433 इंच पाऊस झाला होता. गेल्या काही वर्षांपासून 300 ते 325 इंच सरासरी असणारा पाऊस गेली 2 वर्षे सव्वा चारशेच्यावर पडून शंभर इंच पाऊस जास्त झाला आहे. 2 वर्षापूर्वी 324 इंच इतका पाऊस झाला होता. 
यावर्षी जूनमध्ये 1 जुनपासून फयान वादळामुळे पाऊस वेळेआधी आठवड्यात भरपूर झाला. त्यानंतर जवळपास 2 आठवडे पाऊस नव्हता. 48 इंच पाऊस जूनमध्ये झाला. जुलैमध्ये पावसाने सरासरीपेक्षा जास्त बरसला.

जूनमध्ये अंदाजाने यावर्षी एवढा पाऊस होणार नसल्याचे वाटत होते; मात्र पाऊस कमी कालावधीत जास्त बरसला आहे. गेल्या वर्षी 433 इंच पाऊस झाला होता; मात्र नोव्हेंबरमध्ये पाऊस झाला होता. त्याचे मोजमाप झाले नाही. गेल्या वर्षी जगात सर्वाधिक पावसाचा विक्रम आंबोलीत झाला होता. जगात सर्वाधिक पाऊस हिमालयातील मौसिंराम येथे होतो. त्यानंतर चेरापुंजी येथे; मात्र त्याहीपेक्षा जास्त सह्याद्री पर्वतातील उंच डोंगररांगात असणाऱ्या तळकोकणातील आंबोलीत झाला होता. 

महाराष्ट्रात आंबोलीत सर्वाधिक पाऊस पडतो. 1 जून ते 30 ऑक्‍टोबरपर्यंत पाऊस मोजला जातो. यावर्षी पावसाळ्यात 25 वर्षानंतर प्रथमच पर्यटन बंद असल्याचे पहावयास मिळाले. त्यामुळे पावसाळ्यात आंबोलीत वातावरण पर्यटनाअभावी शांत असले तरी कोरोना आणि पावसाने त्यात भर घातली.

दरवर्षी महालयानंतर पाऊस कमी होतो आणि दसऱ्याला तो जातो. अगदीच क्वचित लागतो; मात्र यावर्षी अजूनही दमदार पाऊस होत होता. 
गेल्यावर्षी घाट कोसळून नुकसान झाले होते. यावर्षी कोरोनामुळे लॉकडाऊनचा फटका इथे बसला. यामुळे पर्यटन मंदावले. येथे 31 ऑक्‍टोबरपर्यंत पाऊस मोजला जातो; मात्र गेल्यावर्षीच्या जवळपास यंदा पाऊस झाला, असे पर्जन्यमापक भाऊ ओगले यांनी सांगितले. सरासरीच्या 100 इंच पाऊस जास्त झाला. सलग 2 वर्षे वाढलेल्या पावसामुळे शेतीचे मात्र जास्त नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तीनेही बरेच नुकसान केले आहे. 

वर्षा पर्यटनामुळे रोजगार 
वर्षा पर्यटनामुळे इथला पावसाळा महत्वाचा असतो तो बऱ्याच जणांना रोजगार देतो आणि पर्यटकांच्या दृष्टीने एक पर्वणी असते. धबधबे, धुके, मुसळधार पाऊस, घाट परिसर, ओलावा आणि थंडी, चिंब भिजवणारा पाऊस यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने हजारोच्या संख्येने आंबोलीत पर्यटक दाखल होतात; मात्र 2 वर्षे वाढलेल्या पावसात पर्यटनासाठी तो वजाबाकी ठरला. 

संपादन - राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

रात्री बसमध्ये झोपलेली, सीटच्या मागून कमरेत हात; सई ताम्हणकरने तोच हात पकडला आणि... स्वतः सांगितला तो प्रसंग

Agricultural Crime : रात्रीतून फळबागेतील डाळिंब लंपास चौसाळ्यातील घटना, गुन्हा नोंदविण्यासाठी वजन-किमतीचा मुद्दा ठरतोय कळीचा

Video : "यापेक्षा कार्टून बरं" जानकी-हृषीकेशमध्ये येणार दुरावा ; घरोघरी मातीच्या चुलीवर प्रेक्षक वैतागले

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

SCROLL FOR NEXT