red chilli powder rate increased for this year in chiplun ratnagiri 
कोकण

यंदा चटणीचा तडखा झोंबणार; लाल मिरचीच्या दरात 25 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : मार्च महिन्याच्या मध्यानंतर गृहिणींची वर्षभराकरिता मसाला बनविण्याची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे लाल मिरची तसेच गरम मसाल्याच्या जिन्नसांना मोठी मागणी आहे. दरम्यान, लाल मिरचीच्या उत्पादनात झालेली घट आणि इंधन दरवाढीमुळे वाढलेला वाहतूक खर्च यामुळे यंदा शंकेश्वरी, बेडगी, पांडी, काश्‍मिरी तसेच लवंगी मिरचीच्या दरांमध्ये 25 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. धने, लवंग, दालचिनी यांसारखे जिन्नसही महागले आहेत. त्यामुळे यंदा लाल मसाला गृहिणींसाठी किमतीला चांगलाच तिखट ठरण्याची चिन्हे आहेत. 

मार्च ते मे महिन्याच्या कालावधीत उन्हाचा तडाखा जास्त असल्याने हा काळ लाल मसाला बनविण्यासाठी उत्तम मानला जातो. यासाठी मार्च ते एप्रिल महिन्याच्या दरम्यान ग्राहकांची मिरच्या खरेदी करण्यासाठी मसाला बाजारात मोठ्या संख्येने गर्दी होत असते. या काळात शंकेश्वरी, बेडगी, लवंगी, काश्‍मिरी, पांडी या मिरच्यांना मोठी मागणी असते. महाराष्ट्रासह, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू या राज्यांतून या मिरच्या चिपळूण शहर आणि उपनगरातील बाजारांत फेब्रुवारी महिन्यात विक्रीसाठी दाखल होतात. याही वर्षी या मिरच्या बाजारात दाखल झाल्या असून गेल्या वर्षीच्या तुलनेत या मिरच्यांच्या दरांत 25 ते 30 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे या मिरच्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याने त्यांच्या उत्पादनात घट झाली आहे, असे मिरचीचे व्यापारी विनायक रेडीज यांनी सांगितले. 

गरम मसालाही महागला 

गरम मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या धणे, खसखस, दगडफूल, लवंग, दालचिनी, तेजपत्ता या जिन्नसांच्या दरातही वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षी हजाराच्या आत ते 1 हजार 125 रुपये प्रति किलोने विकले जाणारे हे जिन्नस यंदा 1 हजार रुपये ते 1 हजार 500 रुपये प्रति किलोने विकले जात आहेत. मिरच्यांच्या दरवाढीचा परिणाम या जिन्नसांवर झाला आहे, अशी माहिती विक्रेते विलास जाधव यांनी दिली. 

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India SIR Schedule: बिहारनंतर देशातील १२ राज्यांमध्ये एसआयआर लागू, निवडणूक आयोगाची मोठी घोषणा, जाणून घ्या 'या' राज्यांची नावे

'ह्युमन कोकेन' हिंदी सायकॉलॉजिकल थ्रिलर लवकरच होणार रिलीज ! पुष्कर जोगचा नवा प्रयोग

Bachu Kadu News: 'तर आम्ही छातीवर गोळी घ्यायला तयार', कडू संतापले!

Latest Marathi News Live Update : दहशतवादी विरोधी पथकाकडून कोंढव्यामध्ये दहा ठिकाणी छापे, एकाला अटक

Georai News : अनाथालयात वाढलेला बनला दोन अनाथ मुलींचा पाठीराखा; दत्तक घेत शिक्षणाची जबाबदारी उचलत साजरी केली भाऊबीज

SCROLL FOR NEXT