Red Eared Spider Turtle Found In Tilari Sindhudurg Marathi News
Red Eared Spider Turtle Found In Tilari Sindhudurg Marathi News 
कोकण

तिलारीत सापडले 'हे' दुर्मिळ कासव 

प्रभाकर धुरी

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) - तिलारी नदीत लाल कानाचे (रेड इअर्ड स्लायडर टर्टल) दुर्मिळ कासव आढळले. मुळस परिसरात काम करणाऱ्या मजुरांना ते नदीपात्राशेजारी सूर्यस्नान घेताना आढळले. त्यांनी त्याला पकडून घरी नेण्याची तयारी चालवली होती; मात्र हेवाळे येथील आनंद शेटकर यांनी त्यांना यापासून परावृत्त केले. 
रेड इअर्ड स्लायडर टर्टल प्रजाती गोड्या पाण्यात राहणारी.

विशेषतः हे कासव वेगवान नदी प्रवाहाऐवजी हळू वाहणाऱ्या नद्यांमध्ये राहते. शांत उबदार पाण्यात म्हणजे डोह, खाडी, तलाव अशा ठिकाणी राहणे ते पसंत करते. त्याला उष्ण हवामान अतिशय आवडते. ते शीत रक्ताचे असते. ते उभयचर असले तरी त्याला जास्तीत जास्त वेळ नदीकाठावर ऊन शेकत बसायला आवडते. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता वाढते. थंडीच्या दिवसांत ते गतिहीन होतात तर उन्हाळ्यात चपळ होतात. ऊन घेण्यासाठी ते नदीकाठावर एकटे किंवा एकमेकांच्या पाठीवरही बसतात. ते पाळण्यासही योग्य असल्याने अनेक देशांत त्यांना फिश टॅंकमध्ये ठेवून पाळले जाते. त्यांच्या अंगावर विशिष्ट प्रकारचे बॅक्‍टेरिया असतात. ते धोकादायक असल्याने त्याची हाताळणी काळजीपूर्वक करावी लागते. विशेष म्हणजे ऍमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या साईटवर ती विकण्यासाठी ठेवली जातात; तथापि ऑस्ट्रेलिया, युरोप आदी ठिकाणी त्यांच्या आयातीवर बंदी आहे. जपानही बंदीच्या विचारात आहे. युनायटेड स्टेटसमध्ये चार इंचांपेक्षा कमी लांबीचे कासव विकणे बेकायदा मानले जाते.

कासवाची मूळ प्रजाती मिसिसिपी नदी परिसरातील

या कासवाचे आयुर्मान 30 ते 50 वर्षे असते. नर कासव दोन ते तीन वर्षांत तर मादी पाच ते सात वर्षांत प्रजननक्षम होते. मादी एका वेळेला दोन ते तीस अंडी घालते. वर्षात साधारणपणे पाच वेळा ती अंडी देते. अंड्यातून पिल्ले बाहेर येण्याचा काळ कमीत कमी 59 दिवसांचा असतो. या कासवाची मूळ प्रजाती मिसिसिपी नदी परिसरातील आहे. गल्फ ऑफ मेक्‍सिको, साऊथर्न युनायटेड स्टेटस येथील मूळ प्रजाती ऑस्ट्रेलिया, युरोप, ग्रेट ब्रिटन, दक्षिण पूर्व आशिया आदी ठिकाणी ही प्रजाती आढळते. 

सापडलेले कासव  आहे असे

तिलारी नदीत सापडलेले हे कासव त्याच प्रजातीतील आहे. ते महापुरामुळे तिलारीत आले की त्याला पाळणाऱ्या कुणी नदीत आणून सोडले हे मात्र कळणे कठीण आहे.  मुळस हेवाळे पुलाजवळ खरारी नदीपात्रात आढळलेले कासव नर जातीचे आहे. त्याची लांबी साधारण सात इंच तर रुंदी साधारणपणे चार इंच होती. आनंद शेटकर यांनी त्या कासवाला तिलारी नदीत नेऊन सोडले. 

नाव लाल कानाचा; पण... 

याचे नाव लाल कानाचा कासव असे असले तरी डोक्‍याच्या दोन्ही बाजूला लाल रंगाचे कानासारखे भाग दिसतात ते कान असत नाहीत. कान आतल्या भागात असतात. विशेष म्हणजे या कासवाला दात असत नाहीत तर चोचीसारखा भाग असतो. ते लवकर माणसाळते म्हणून त्याला पाळले जाते. 

नर, मादी कशी ओळखावी? 

नर आणि मादी यांच्या शेपटी आणि कवचाच्या आकारात फरक असतो. नराची शेपटी लांब, पाठीवरील कवच सपाट तर मादीचे अंडाकृती असते. नराचा खालील कवच्याचा शेपटीकडील भाग त्रिकोणी तर मादीचा गोल असतो. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

Kanhaiya Kumar: कन्हैया कुमार यांच्याकडे एवढी आहे संपत्ती; दिल्लीच्या उमेदवारांमध्ये मनोज तिवारी सर्वात श्रीमंत

PM Modi's Advice To Muslims: जगभरातला मुसलमान बदलतोय पण... मुस्लिम धर्मियांना पहिल्यांदाच PM मोदींनी का दिला सल्ला?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सांगोल्यात दोन गटांमध्ये हाणामारी, शेकाप कार्यकर्ते अन् शिवसैनिक भिडले

Shekhar Suman : शेखर यांच्या मुलाला होता 'हा' गंभीर आजार; लेकाच्या निधनानंतर उचललं गंभीर पाऊल

SCROLL FOR NEXT