Pramod Jathar esakal
कोकण

रिफायनरीचे 'PRO' म्हणून प्रमोद जठारांची नेमणूक करा

'प्रमोद जठार विनाशकारी रिफायनरी प्रकल्प करू इच्छिणाऱ्या दलालांची भाषा बोलताहेत'

सकाळ वृत्तसेवा

'प्रमोद जठार विनाशकारी रिफायनरी प्रकल्प करू इच्छिणाऱ्या दलालांची भाषा बोलताहेत'

कुडाळ : सध्या माजी आमदार प्रमोद जठार ज्या तडफेने रिफायनरी कंपनीची बाजू मांडत आहेत, ते पाहता त्यांना लोकप्रतिनिधी म्हणवून घेण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यांची रिफायनरी कंपनीचे पीआरओ म्हणुन नेमणूक करावी, असा सल्ला जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांनी दिला.

परब यांनी पत्रकात म्हटले आहे, खासदार विनायक राऊत हे जनतेच्या भावना संसदेत मांडून विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाला विरोध करीत आहेत. प्रमोद जठार हे विनाशकारी रिफायनरी प्रकल्प करू इच्छिणाऱ्या दलालांची भाषा बोलत असल्यामुळे ते लोकप्रतिनिधी कमी व दलाल जास्त वाटतायत. रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल लिमिटेड (आरआरपीसीएल) कंपनीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी (पीआरओ) म्हणुन सध्या अनिल नागवेकर कार्यरत आहेत. माझी कंपनीला विनंती आहे की ज्या पद्धतीने प्रमोद जठार रिफायनरी प्रकल्पाची ज्या पद्धतीने भलावण करत आहेत ते पाहता कंपनीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणुन अनिल नागवेकरांच्या ऐवजी त्यांचीच नेमणुक करण्यात यावी.

एका विनाशकारी प्रकल्पाची भलावण करणारा यापेक्षा चांगला बोलका पोपट रिफायनरी कंपनीला शोधुन सुद्धा सापडणार नाही. जठारांना मला एवढेच सांगायचे आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दलालांचे कधीच ऐकत नाहीत. त्यांनी नेहमी जनतेचेच म्हणणे ऐकले आहे. 'नाणार राहणार, रिफायनरी जाणार' ही घोषणा उद्धव ठाकरेंनी सर्वात पहिल्यांदा जाहीर सभेत केली होती. ठाकरेंनी जनतेला दिलेला शब्द हा एखाद्या ब्रम्हवाक्यासारखा असतो. तो कधीही बदलत नाही. त्यामुळे प्रमोद जठार दगडावर कपाळ आपटून कपाळमोक्ष झाले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या रिफायनरी संदर्भातील भुमिकेत तसूभरही फरक पडणार नाही. रिफायनरीची दलाली अंगाशी आल्यामुळेच जठार आगपाखड करत आहेत. रिफायनरीसाठी जनआंदोलन करण्याची भाषा कराल तर कोकणची सुज्ञ जनता शांत बसणार नाही. रिफायनरीच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा करणाऱ्या दलालांना कोकणची जनताच मारेल, हे जठारांनी नीट लक्षात ठेवावे.

कामचुकारपणा उघड

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास पूर्ण झाले. मग ते रत्नागिरी जिल्ह्यातच कसे काय रखडले...? राष्ट्रीय महामार्गाचे रत्नागिरीतील व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांची नियुक्ती ही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनीच केली होती. रत्नागिरीतील राष्ट्रीय महामार्गाचे काम हे कंत्राटदाराच्या कामचुकारपणामुळेच रखडले आहे, असे परब म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

AUS vs BAN : ऐ, निघ इथून! मिचल स्टार्क अन् मेहिदी हसन मिराझ यांच्यात शाब्दिक खडाजंगी; बांगलादेशच्या हल्ल्याने कांगारू बिथरले Video

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

आफ्रिकेत Business करायचाय? दक्षिण आफ्रिकेच्या Consul General नी सांगितला ‘गेटवे’ फॉर्म्युला

Marathi Language: मोठी बातमी! रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ, राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT