कोकण

शिवसेनेच्या नगरसेविकेची हकालपट्टी; रिफायनरीच्या ठरावाला मतदान महागात

नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प विरोधी भूमिका शिवसेनेकडून घेतली गेली

राजेंद्र बाईत

राजापूर : तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाला (refinery porject nanar) शिवसेना पक्षाचा विरोध (shivsena) असताना शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांनी प्रकल्प समर्थनार्थ घेतलेल्या भूमिकेचे संघटना पातळीवर पडसाद उमटले आहेत. नगर पालिकेमध्ये मंजूर झालेल्या रिफायनरी प्रकल्प समर्थन ठरावाच्या बाजूने मतदान करणार्‍या प्रतिक्षा खडपे यांची पक्षविरोधी भूमिका घेतल्याने पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याची माहिती आमदार राजन साळवी यांनी दिली.

तालुक्यातील नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प विरोधी भूमिका शिवसेनेकडून घेतली गेली आहे. त्याबाबतची भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी वारंवार स्पष्ट केली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या अनेक पदाधिकार्‍यांनी प्रकल्प समर्थनाची भूमिका घेतली आहे. त्यामध्ये शिवसेनेच्या नगरसेविका प्रतिक्षा खडपे यांचा आता समावेश झाला आहे. येथील नगर पालिकेच्या काल झालेल्या सभेमध्ये रिफायनरी प्रकल्प उभारणीला पाठींबा देणारा ठराव मंजूर झाला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसह भाजपच्या नगरसेवकांनी प्रकल्प समर्थन ठरावाच्या बाजूचे मतदान केले.

शिवसेनेचे गटनेते श्री. गुरव आणि अन्य चार नगरसेवकांनी संघटनेची प्रकल्प विरोधी भूमिका कायम ठेवताना ठरावाच्या विरोधामध्ये मतदान केले. सेनेच्या प्रतिक्षा खडपे यांनी मात्र, प्रकल्प समर्थनाच्या ठरावाच्या बाजूने मतदान केले. त्यांच्या या भूमिकेचे  शिवसेना संघटनेमध्ये पडसाद उमटले आहेत.      

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी प्रकल्प विषय संपल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे नगर पालिकेच्या सभेमध्ये शिवसेना गटनेते आणि नगरसेवकांनी प्रकल्प विरोध दर्शविला. परंतु, प्रतिक्षा खडपे यांनी पक्ष विरोधी भूमिका घेतली. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार असल्याचे आमदार साळवी यांनी माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT