Refinery Survey 
कोकण

Refinery Survey: बारसू रिफायनरीचं सर्वेक्षण पेटलं; विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्षांना अटक

कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे.

धनश्री ओतारी

कोकणातल्या रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. दरम्यान, मोठी अपडेट समोर आली आहे. रिफायनरी विरोधी संघटनेचे मुंबई अध्यक्ष वैभव कोळवणकर यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. तसेच, त्यांच्यासोबत इतर दोघांनाही अटक करण्यात आली आहे. ( Refinery Survey second day vaibhav kolvankar arrested )

रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये होणार होता. याला ग्रामस्थांचा तीव्र विरोध झाला. त्यानंतर महाविकास आघाडीने हा प्रकल्प तेथून हलविण्याचा निर्णय घेत तो बारसू, सोलगावमध्ये करण्याचा निर्णय घेतला होता.

आतापर्यंत या ग्रामस्थांनी तीन वेळा बारसू रिफायनरीचा सर्व्हे बंद पाडला आहे. 24 एप्रिलपासून बारसू रिफायनरी प्रकल्पाचे सर्वेक्षण पुन्हा सुरू होण्याची माहिती मिळताच गेल्या काही दिवसांपासून बारसू आणि सोलगावासह आजूबाजूच्या स्थानिक ग्रामस्थांनी मोठे आंदोलन उभारण्याची तयारी सुरू केली होती.

काल राजापूर तालुक्याचे तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.

दरम्यान पोलिसांनी जवळपास दोन हजारांचा फौजफाटा तैनात केला आहे. त्यामुळे सर्वेक्षण सुरू झाल्यानंतर जोरदार विरोध होण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली आहे.

बारसू, सोलगावसह आसपासच्या परिसरात जमाबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. रिफायनरी विरोधकांच्या प्रमुख नेत्यांना तालुका बंदी करण्यात आली आहे. गावागावातील काही प्रमुख घरांवर पोलिसांनी नोटीस लावल्या आहेत. तर दुसरीकडे कोकणातील रिफायनरी विरोधक आंदोलनावर ठाम आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT