Appeal Minister Uday Samant in kokan 
कोकण

उदय सामंत : सर्व धर्मियांनी आपापले धार्मिक सण साजरे करा पण.....हे नियम पाळा

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : परस्पर सामंजस्याने शासनाच्या सर्व नियमांच्या अधीन राहून सर्व धर्मियांनी आपापले धार्मिक सण साजरे करावेत, असे आवाहन मंत्री उदय सामंत यानी केले .


आगामी काळात येणारे गणेश उत्सव, बकरी ईद, तसेच श्रावण महिन्यातील विवीध देवस्थान मधील नाम सप्ताह इत्यादी सणांच्या पार्श्वभूमीवर अधीकारी वर्ग, देवस्थानचे प्रतिनिधी, मुस्लिम समाजातील प्रतिनिधी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन अल्पबचत भवन रत्नागिरी येथे करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.


कोरोना मुळे अनेक निर्बंध आले असताना आपले अनेक वर्षांचे धार्मिक उत्सव, आणि आपल्या धार्मिक परंपरा खंडित होऊ नयेत यासाठी अत्यंत साधे पणाने सर्व उत्सव साजरे करावेत असे आवाहन  श्री सामंत यानी केले. शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत आपण आपल्या धार्मिक परंपरा, पार पाडू.यावेळी लागणारे शासकीय परवाने सक्षम अधिकारी देतील असे सांगत प्रशासन आणि देवस्थान चे प्रतिनिधी यांच्यात समन्वय ठेवण्यासाठी पाच जणांची कमिटी करावी असे सुचित केले. या वेळी श्री मुन्नाशेठ सुर्वे, दिनेश सावंत, भाऊ शेट्ये, गोपी शिवलकर, आदेश चवंडे ही  नावे समन्वयासाठी देण्यात आली.

या बैठकीला जिल्हाधिकारी मिश्रा,आमदार शेखर निकम, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष विजय भोसले, शिवसेना जिल्हा प्रमुख विलास चाळके, आरोग्य व बांधकाम सभापती महेश म्हाप,मनसेचे जितेंद्र चव्हाण, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्री.गायकवाड प्रांताधिकारी श्री सूर्यवंशी, भडकवार , तहसीलदार जाधव साहेब,नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, प्रमोद शेरे  या सह  अनेक देवस्थान ट्रस्ट चे प्रतिनिधी आणि बशीरशेठ मुर्तुझा, अलिमिया काझी यांच्या समवेत अनेक मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT