कोकण

एसटी संपाचा परिणाम; वारकऱ्यांची पंढरपूर वारी महाग

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे; मात्र वारकऱ्यांनी पायीवारीबरोबरच खासगी बस गाड्यांचा पर्याय निवडला

तुषार सावंत

कणकवली : महाराष्ट्राची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढरपूरच्या विठुरायाच्या माघी एकादशी उत्सवासाठी सिंधुदुर्गातून एसटीच्या १२५ गाड्या वारकऱ्यांसाठी सोडल्या जात होत्या. यातून एसटीला तब्बल ४८ लाखाचे उत्पन्न मिळत होते. यंदा मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे; मात्र वारकऱ्यांनी पायीवारीबरोबरच खासगी बस गाड्यांचा पर्याय निवडला आहे. त्यामुळे जिल्हातील वारकऱ्यांचा पंढरपूरचा प्रवास यंदा महागला आहे.

राज्यातील एसटी महामंडळाच्या संपाला नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. तब्बल ९० दिवसापेक्षा अधिक या संपाचा कालावधी लोटला आहे. राज्यातील काही आगारांमध्ये थोड्याफार एसटी बस सेवा सुरू झाली. जिल्ह्यातही काही प्रमुख मार्गावर एसटी बस गाड्या धावत आहे; मात्र एसटीचे जवळपास १४०० पेक्षा अधिक कर्मचारी अजूनही संपावर आहे. विशेष म्हणजे एसटीचे चालक आणि वाहकांनी संपात शंभर टक्के सहभाग नोंदवला आहे. सिंधुदुर्ग विभागातून एसटीच्या नियमित २१०० फेऱ्या होत्या. सध्या दहा ते बारा फेऱ्या सुरू आहेत; मात्र खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील जत्रा, उत्सवातून एसटीला उत्पन्न मिळत असे. याचबरोबर पंढरपूरच्या विठुरायाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांची माघी एकादशीला मोठी रांग लागत असे. जिल्ह्याच्या विविध गावात एसटीच्या विशेष गाड्या सोडल्या जात असत माघी एकादशी उत्सवाला कोकणातून जाणारे पांडुरंगाचे भक्त मोठ्या प्रमाणात आहे. याचे कारण कार्तिकी एकादशीला कोकणात भातपीक घेतले जाते. त्यामुळे वारकरी फारशे कार्तिकी एकादशीला न जाता माघी एकादशीला मोठ्या संख्येने कोकणातील वारकरी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात.

गेल्या दोन वर्षापासून पंढरपूरची विठ्ठलाची यात्रा कोरोना कालावधीत बंद ठेवली होती. यंदा मात्र निर्बंध उठविले आहेत. त्यामुळे पांडुरंगाचे वारकरी मोठ्या संख्येने पंढरपुराकडे निघणार आहेत. काही वारकरी पायी चालत पंढरपूरच्या दिशेने यापूर्वी रवाना झाले आहेत; मात्र माघी एकादशीच्या पूर्वी दोन दिवस सिंधुदुर्गातून जवळपास १२५ पेक्षा अधिक एसटी गाड्या बुकिंग केल्या जात होत्या. जिल्ह्यातून विविध गावातून जाणाऱ्या बस गाड्या दोन दिवस पंढरपूरचा मुक्काम करून परतीच्या प्रवासाला लागतात. एका बस गाडीतून साधारण पन्नास वारकरी पंढरपूरला जात असत यासाठी १२५ पेक्षा अधिक एसटी बस गाड्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असायच्या. या कालावधीत जिल्ह्याचे एसटीचे वेळापत्रकही बदललेले असायचे, कारण बहुतांशी गाड्या पंढरपूरला जायचा. इतकेच काय तर जिल्ह्यातील आंगणेवाडी जत्रा आणि कुणकेश्वर जत्रेला ही मोठ्या प्रमाणात एसटी बस गाड्या सोडल्या जात असत. यंदा मात्र भाविकांची मोठी गैरसोय झाली आहे. पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांनी यंदा खाजगी प्रवासी गाड्या हा पर्याय निवडला आहे. पंढरपूरला जाण्यासाठी मिनीबससाठी यंदा १८ ते २० हजार रुपये मोजावे लागत आहेत. चाळीस सिटर बससाठी ३८ ते ४० तसेच मोठ्या बससाठी ५० हजार रुपये इतके भाडे आहे. पंढरपूरला जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात खाजगी बस गाड्या बुकिंग करण्यात आल्या आहेत. मिनी बसलाही यंदा पंढरपूरसाठी मागणी आहे. त्यामुळे एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फटका बसणार आहे. याचबरोबर जिल्ह्यातील वारकऱ्यांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे; मात्र पांडुरंगावर श्रद्धा असणारे वारकरी मिळेल त्या वाहनाने पंढरपूरच्या दिशेने रवाना होत आहेत.

आरटीओने वारकऱ्यांना त्रास देऊ नये

पंढरपूरच्या यात्रेला जाण्यासाठी यंदा वारकऱ्यांनी खासगी बसगाड्या निवडल्या आहेत. मात्र, अशा बसगाड्या जिल्ह्यातून कोल्हापूर, सांगली, सोलापूरकडे जात असताना आरटीओ विभागाकडून मोठ्या प्रमाणात दिल्या जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरटीओसाठी राज्य सरकारने वारकऱ्यांना त्रास देऊ नये, याबाबत काहीतरी निर्णय घ्यावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे सचिव राजू राणे (हळवल) यांनी व्यक्त केली आहे.

एसटी महामंडळाचा संप असल्याने यंदा आम्ही बसगाड्या उपलब्ध करून देऊ शकत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील वारकऱ्यांची निश्चितपणे गैरसोय होत आहे. संप असल्याने एसटीचे कर्मचारी सेवेत रुजू होत नाहीत. त्यामुळे एसटी बसगाड्या उपलब्ध असल्या, तरी चालक आणि वाहक नसल्याने नियमित वेळापत्रकच सुरू होऊ शकलेले नाही. त्यामुळे जादा गाड्या सोडणे शक्य नाही.

- प्रकाश रसाळ, नियंत्रक, एसटी विभाग

एसटी बससाठी केवळ ३० हजार रुपये इतके भाडे द्यावे लागत होते. यंदा खासगी बसला ५० हजार रुपये बुकिंग करण्यात आले. याचबरोबर छोट्या गाड्या, खासगी गाड्याही पंढरपूरकडे जात आहेत. प्रत्येक गावातून तसे नियोजन करण्यात आले. त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील वारकरी यंदाच्या पंढरपूर यात्रेत सहभागी होऊ शकत नाही. तरीही आम्ही आमच्या परीने सर्वांना सहकार्य करण्याची भूमिका ठेवली. मात्र, आरटीओचा त्रास आम्हाला होता कामा नये, याची सरकारदरबारी काळजी घेणे गरजेचे आहे.

- राजू राणे, सचिव, जिल्हा वारकरी संप्रदाय, हळवल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT