road accident drawing in oros kokan marathi news
road accident drawing in oros kokan marathi news 
कोकण

अल्पवयीन युवकाने घेतला 'यांचा' बळी....

सकाळ वृत्तसेवा

ओरोस (सिंधुदुर्ग) :   मालवण तालुक्यातील आंबडोस व्हाळवाडी येथील रविंद्र लक्ष्मण करावडे ( वय 46 ) यांचा रविवार 23 फेब्रुवारी रोजी रात्री पालघर जिल्ह्यातील नायगांव येथे अपघातात मृत्यु झाला. त्यांच्या निधनाने आंबडोस गावावर शोककळा पसरली आहे.

रस्ता ओलांडतानाच

 मुळ आंबडोस व्हाळवाडी येथील रहिवाशी असलेले रविंद्र करावडे हे नायगांव येथे नोकरी निमित्त कुटुंबासह रहायला होते. रविवारी रात्री सुमारे 8 वाजण्याच्या सुमारास ते लहान भाऊ व पुतन्या यांच्यासमवेत ते राहत असलेल्या ठिकाणी असलेला रस्ता ओलांडत होते. याचवेळी एक अल्पवयीन युवक भरधाव वेगाने दुचाकी घेवून आला. या दुचाकी स्वाराने रविंद्र यांसह त्यांच्या सोबत असलेल्या छोट्या पुतन्याला जोरदार धडक दिली. यामुळे रविंद्र यांचा एक पाय फॅक्चर झाला.

ते रस्त्यावरच कोसळले

तर दुचाकीची धडक बसल्याने ते रस्त्यावर कोसळले. यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसला. परिणामी त्यांचा जागीच मृत्यु झाला. सुदैवाने सोबत असलेल्या त्यांच्या पुतन्या व भाऊ याला कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघातात रविंद्र यांचा मृत्यु झाल्याने करावडे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रविंद्र यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन भाऊ, दोन बहिनी, भावजय, भाऊजी, पुतने, पुतनी असा परिवार आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला आव्हान देण्यासाठी पंजाब सज्ज; आत्तापर्यंत कोणाचं पारडं राहिलंय जड

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

SCROLL FOR NEXT