robbery robbed with knife in ratnagiri kokan marathi news
robbery robbed with knife in ratnagiri kokan marathi news 
कोकण

फिल्मी स्टाईलने चाकूचा धाक दाखवून ४० लाखांचा ऐवज लुटला...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : चाकूचा धाक दाखवत गोदामातून ४६ लॅपटॉप, १० मॉनिटर असा मिळून सुमारे ४० लाखांचा ऐवज लुटल्याची घटना शिवाजीनगर परिसरात घडली. गाडीतून आलेल्या तीन अनोळखी तरुणांनी ही चोरी केली. भरदिवसा हा प्रकार घडला.
शहरातील परकार हॉस्पिटल शेजारील रोडवर असलेल्या एका इमारतीत व्यंकटेशा सिस्टीम नावाचे लॅपटॉप मॉनिटर विक्रीचे होलसेलचे गोदाम असून याचे मालक प्रवीण घोरपडे सांगलीचे आहेत. घोरपडे यांचा भाचा संकेत चव्हाण हा येथील 
व्यवसाय सांभाळतो. रविवारी सायंकाळी तीन तरुण या गोदामा बाहेर आले व संकेत नावाने आवाज दिला.

यातील संकेत चव्हाण हा कामगार एका रुममध्ये झोपला होता. त्याला नावाने आवाज दिल्याने कोणतरी ओळखीचे ग्राहक आलेत, असे समजून त्याने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच त्या तीन संशयित तरुणानी आतमध्ये प्रवेश केला. गोदामात प्रवेश करताच त्यातील एका संशयित तरुणाने खिशातील चाकू बाहेर काढून संकेत याला धमकाविण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एकाने संकेत याला पकडले तर काही कळायच्या आत दुसऱ्याने त्याच्या तोंडावर चिकट टेप लावून त्याचे तोंड बंद करून ठेवले.

आवाजाची आरोळी ठरली घातक

त्याचवेळी गोदामातील प्लास्टिकच्या खुर्चीला दोरीच्या सहाय्याने संकेत याला बांधून ठेवले. यातील तीन संशयित तरुण गोदामात शिरल्यानंतर त्यांनी येथील कामगार संकेत याचे तोंड बंद करून त्याला खुर्चीला बांधल्यानंतर गोदामातून  लॅपटॉप, मॉनिटर व स्पीकर असा ऐवज पटापट बाहेर काढू लागले. काही वेळातच या टोळक्‍याने गोदाम साफ करून ऐवज सोबत आणलेल्या चारचाकी गाडीत भरला.व्यंकटेशा सिस्टीममधून गोदामातून  लॅपटॉप,  मॉनिटर व स्पीकर असा ऐवज गाडीत भरल्यानंतर संकेत याला किचनमध्ये बांधुन ठेवत या चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.

  जाताना सिसिटीव्हीचा डीव्हीआर देखील नेला चोरून

येथून निसटण्यापूर्वी गोदामाला बाहेरून कडी घालून चोरटे घटनास्तळावरून पसार झाले. सजग नागरिकांनी हा प्रकार पहिला. तत्काळ शहर पोलिसांना काॅल केला. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संकेत याची सुटका केली. पोलीस घटनास्थळी पोहचले, त्यावेळी संकेत हा खुर्चीला बांधलेला दिसून आला.या घटनेत चोरट्यांनी मोठा डल्ला मारला असून गोदामातून  ४६ लॅपटॉप, १० मॉनिटर असा मिळून सुमारे ४० लाखांचा ऐवज लुटल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. तसेच गोदामातून पळ काढण्यापूर्वी आपण सीसीटीव्हीमध्ये दिसू शकतो, हे लक्षात आल्याने चोरट्यांनी गोदामातील सिसिटीव्हीचा डीव्हीआर देखील चोरून नेला आहे. भर दिवसा हा प्रकार घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज गणपतीपुळ्यात... -

गुन्हा दाखल
याप्रकरणी पोलिसांनी संकेत चव्हाण याची तक्रार घेतली असून या तक्रारीवरून पोलिसांनी तीन संशयित चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिल लाड यांच्यासह एपीआय भोसले, एपीआय पाटील, एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक विकास चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT