Rohini Ashok Nivdunge health worker story by sachin mali mandangad ratnagiri 
कोकण

Navdurga Special : व्यंगावर मात करत तिने घेतला आरोग्य सेवेचा वसा ,मंडणगडातील नवदुर्गाची कहाणी

सचिन माळी

मंडणगड (रत्नागिरी) : जन्मताच उजव्या पायाला आलेल्या अपंगत्वाचा कोणताही बाऊ न करता नागरिकांच्या आरोग्य सेवेचा वसा घेतलेल्या आरोग्य सेविका रोहिणी अशोक निवडुंगे या नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहेत. कौटुंबिक जबाबदारी सांभाळून लोकसेवेचे घेतलेले हे व्रत एसटीने प्रवास करून प्रसंगी आलेल्या अडचणी, समस्यांवर मात करीत कोरोना काळातही आपले कर्तव्य बजावताना कोणतीही कसूर केली नाही.


 सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात अढुपेट मुळगाव असणाऱ्या रोहिणी निवडुंगे या २७ जानेवारी २०१२ रोजी मंडणगड तालुक्यातील पणदेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुजू झाल्या. पती अशोक निवडुंगे व आठ वर्षांच्या रुद्र समवेत त्या राहत असून मोठा मुलगा सोहम गावी आईकडे असतो. एकत्रित कुटुंब पद्धत असल्याने सामाजिक कार्य करण्यास सोपे जात आहे. तीन वर्षे पणदेरी परिसरात सेवा बजावल्यानंतर २०१५ साली त्यांची नारगोली आरोग्य उपकेंद्रात बदली झाली. यात नारगोली, माहू, बोरघर, शिरगाव-आतकोल, मंडणगड शहर या गावांचा समावेश असून अल्पावधीतच त्या घरोघरी पोहचल्या. पाच गावांतील १७४० कुटुंबातील ६०३४ नागरिकांना आरोग्य सेवा पुरविताना कोरोना महामारीच्या काळात केलेले काम कौतुकास्पद आहे.

लॉक डाऊनच्या काळात तालुकाबाहेरून गावात येणाऱ्या नागरिकांना होम कोरोन्टाईन करणे, त्यांची भेट घेवून सूचना करणे, आरोग्य सुरक्षित करण्यासाठी असलेल्या उपाययोजनांची माहिती देवून गावोगावी जनजागृती केली. चुकीच्या माहितीमुळे निर्माण झालेली कोरोनाविषयीची भीती लोकांच्या मनातून काढताना आपल्या शांत आणि संयमी बोलण्यामुळे पाचही गावांतील नागरिकांकडून त्यांना चांगला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. माझे कुटुंब, माझी जबाबदारी अभियानातंर्गत नागरिकांची थर्मामीटर व ऑक्सिमिटरच्या सहाय्याने तपासणी सर्वेक्षण करताना त्या अग्रेसर राहिल्या. 

मंडणगड शहरात कोरोना बाधित रुग्ण सापडून येत असताना कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींचा डाटा तयार करून शोध घेणे यात त्यांनी आपली योग्य भूमिका बजावली. आरोग्य सेवा देत असताना त्यांना तालुका वैद्यकीय अधिकारी प्रभाकर भावठाणकर, सुपरवाईजर जी.नवाले, आरोग्य सहाय्यीका एम.के.तडवी, आरोग्य सेवक विजय उबाळे, विजय दुर्गवले, रवींद्र पाटील, दीपाली जाधव, आशा सेविका मंडणगड मानसी सापटे, भूमिका पोस्टुरे, माहूच्या वंदना जाधव, बोरघर मानसी जाधव, नारगोली संजीवनी सागवेकर, मदतनीस मंदाकिनी जाधव, अंगणवाडी सेविका, प्रत्येक गावांचे सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामसेवक, कर्मचारी व ग्राम कृती दलाचे मार्गदर्शन व सहकार्य मिळाल्याचे त्या आवर्जून सांगतात.

आदिवासी महिलांमध्ये आरोग्य जागृती
 रोजगारानिमित तालुक्यात येणाऱ्या व रानावनात राहणाऱ्या आदिवासी समाजातील महिलांमध्ये प्रसूती, तपासण्या व आरोग्याची जागृती करीत आहेत. सुरवातीला त्यांना नकारात्मक विरोध झाला. यामध्ये प्रामुख्याने रोजच्या कामावर पोट असल्याने आर्थिक अडचण असल्याचे सांगण्यात आले. मात्र, नाउमेद न होता गरोदर महिलांना सोनोग्राफी, रक्त तपासणीचे महत्व समजावून, पटवून सांगत त्यांचा नकार होकारात बदलण्यात त्या यशस्वी झाल्या. त्या महिला आरोग्याविषयी जागरूक असून वेळोवेळी तपासण्या करीत असल्याचे रोहिणी निवडुंगे यांनी सांगितले.


आरोग्य सेवा श्रेष्ठ असून त्यातून समाधान मिळते. कामाच्या बदल्यात मिळणाऱ्या शासकीय मानधना बरोबर लोकांकडून मिळणारे आशीर्वाद व प्रेम तितकेच बहुमूल्य आहे. याकामी कुटुंबीयांची मिळालेली साथ महत्वपूर्ण आहे.
- रोहिणी निवडुंगे, आरोग्य सेविका.

संपादन - अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : उत्तरप्रदेशात मराठी तरुणाला भोजपुरीत बोलण्यासाठी दमदाटी, भाषा येत नाही म्हटल्यावर....पाहा व्हिडीओ

Latest Maharashtra News Live Updates: नांदगावच्या दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान, ग्रामस्थ आनंदीत

VIRAL VIDEO: दुध विक्रेता चक्क दुधात थुंकला, घटनेचा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल

Ashadhi Ekadashi : नाशिकच्या विठ्ठल मंदिरांत आषाढीला भक्तीचा झगमगाट

Crime News: हॉर्न वाजविल्याच्या किरकोळ कारणाने दोन गटांत हाणामारी; सूतगिरणी चौकातील घटना

SCROLL FOR NEXT