russia ukraine war update Mansi Sawant return home safe  sakal
कोकण

बांदा : दैव बलवत्तर म्हणून कुटुंबात सुखरूप

मानसी सावंत शेर्लेतील युवती युक्रेनमधून परतली

नीलेश मोरजकर

बांदा: युक्रेनमधील युद्धजन्य भागातील ते आठ दिवस जीव मुठीत घेऊन घालविले. सतत घोंघावणारी फायटर विमानाने आणि बॉम्बच्या कानठळ्या बसविणाऱ्या आवाजाने मनात भीतीचे काहूर दाटायचे. बाहेर काय होतेय, याची माहिती टीव्हीवर मिळत होती; मात्र कोणत्या क्षणी काय होईल, याची कोणतीही कल्पना नव्हती. घरातील प्रत्येकाच्या आठवणीने जीव कासावीस होत होता.

केवळ दैवावर विश्वास ठेवत प्रत्येक क्षण केवळ चमत्काराची वाट बघत होतो. अखेर आठव्या दिवशी पोलंडच्या सीमेवरून रोमानिया देशात पोहोचलो आणि जीव भांड्यात पडला. रोमानियन नागरिकांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून केलेली मदत न विसरता येण्यासारखी आहे. केवळ दैव बलवत्तर म्हणून आज माझ्या घरी नातेवाईकांसोबत आहे, असे भावोद्‌गार युक्रेनमधून शेर्ले (ता. सावंतवाडी) येथे सुखरूप परतलेल्या मानसी दीपक सावंत या तरुणीने ‘सकाळ’शी बोलताना काढले.आठ दिवसांपासून रशिया व युक्रेनमध्ये घमासान युद्ध सुरू आहे.

रशियाने युक्रेनच्या अनेक शहरांना दैव बलवत्तर म्हणून कुटुंबात सुखरूप केल्याने अपरिमित हानी झाली आहे. या युद्धाचा तेथील दैनंदिन व्यवहार, शिक्षण व्यवस्थेला सर्वाधिक फटका बसला आहे. युक्रेनमध्ये भारतीयांसह अनेक देशातील विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी मोठ्या संख्येने जातात. शेर्ले येथील मानसीचे बारावीपर्यंतचे शिक्षण बांद्यात झाले. त्यांनतर वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएसचे शिक्षण घेण्यासाठी ती २०१८ ला युक्रेनला गेली. पश्चिम युक्रेनमध्ये टणोपेल शहरात तिने टणोपेल नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये वैद्यक शास्त्राच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. ती सध्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत आहे. विद्यापीठात ती लेडीज होस्टेलमध्ये राहते. तिच्यासोबत १४ विद्यार्थ्यांची बॅच असून गुजरात, केरळ व झारखंडमधील अशा एकूण चौघी सोबत राहतात. या ठिकाणी शिक्षण पद्धती चांगली असून, भारताच्या तुलनेत शिक्षण स्वस्त असल्याने बरेच विद्यार्थी शिक्षणासाठी युक्रेनची निवड करत असल्याचे तिने सांगितले. मानसीची आई शिक्षिका असून वडील शेतकरी आहेत. वर्षातून ती एकदा भारतात येते; मात्र दोन वर्षे कोरोनामुळे ती भारतात आली नव्हती.

मानसी म्हणाली, ‘‘युक्रेन व रशिया हे शेजारी देश असून २००९ पासून या दोन्ही देशांत कुरबुरी सुरू होत्या; मात्र २१ फेब्रुवारीला रशियाने युक्रेनवर पहिला हल्ला केला. त्यानंतर त्या ठिकाणची सर्वच परिस्थिती बदलली. देशात अराजकता निर्माण झाली. युद्धजन्य स्थिती निर्माण झाली. जागोजागी मिलिटरी जवान, प्रशासनाचे सतर्कता देणारे सायरन वाजू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. ऑफलाईन सुरू असलेले आमचे शिक्षण बंद झाले. सर्वांना घरीच सुरक्षित राहण्याच्या सूचना स्थानिक प्रशासन व विद्यापीठाकडून देण्यात आल्या. सतर्कतेसाठी सायरन वाजविण्यात येत असल्याने आम्ही राहत असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर नेण्यात आले. दिवसेंदिवस युद्धाची भयानकता वाढत असल्याने आम्ही सर्वजण चिंतेत होतो. भारतातून काळजी घेण्यासाठी सतत फोन येत होते. मधल्या दोन दिवसांत संपर्क यंत्रणा बंद पडल्याने नातेवाईकांशी संपर्क साधणे देखील कठीण झाले. विद्यापीठाने सर्व विदेशी विद्यार्थ्यांना भारतात जाण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार आम्ही २६ फेब्रुवारीला टणोपेल येथून बसने रोमानिया देशाच्या सीमेवर आलो.

हा पाच तासांचा प्रवास आव्हानात्मक होता. सीमेवर पोहोचल्यानंतर भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांनी रोमानिया देशाची राजधानी बुखारेस्टपर्यंत नेण्यासाठी बसची व्यवस्था केली होती. आम्ही जवळपास १५० विद्यार्थी होतो. रोमानिया देशातील नागरिकांनी माणुसकी दाखवित सर्व विद्यार्थ्यांना जेवण, पिण्यासाठी पाणी व इतर जीवनावश्यक वस्तू देऊन सहकार्य केले. रोमानियाच्या सीमेपासून १० तास बसप्रवास केल्यानंतर आम्ही बुखारेस्ट येथे पोहोचलो. तेथून एअर इंडियाच्या विमानातून ३ मार्चला रात्री नवी दिल्ली येथे पोहोचलो. स्थानिक प्रशासनाबरोबरच भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांनी मदत केल्यानेच सुखरूप मायदेशात पोहोचलो. युक्रेनमधील टणोपेल ते नवी दिल्ली असा तीन दिवसांचा थरारक प्रवास आयुष्यात कधीही विसरू शकत नाही. विद्यापीठाने १४ मार्चपर्यंत सुटी जाहीर केली आहे. त्यानंतर दोन महिने ऑनलाईन शिक्षण व ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. १ सप्टेंबरला शेवटच्या वर्षाचा वर्ग सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाने दिली आहे. लवकरात लवकर युद्धविराम होऊन शिक्षण सुरू होईल, अशी अपेक्षा आहे.’’

रशियाने आक्रमणाची धार वाढविल्याने आता देशाला वाचविण्यासाठी प्रत्यक्ष युक्रेनियन नागरिक रस्त्यावर उतरला आहे. देशाच्या पूर्व भागात ज्या ठिकाणी रशियन सीमा आहे, त्या ठिकाणी सर्वाधिक नुकसान झाले आहे. दिवसेंदिवस युद्धाचा विळखा अधिकाधिक घट्ट होत आहे. अद्यापही भारतीय विद्यार्थी त्या ठिकाणी अडकले आहेत.

- मानसी सावंत

मानसी युक्रेनमध्ये अडकल्याने सर्वजण काळजीत होतो. सरपंच उदय धुरी, जिल्हा परिषद सदस्या उन्नती धुरी, मानसीचे काका शाम सावंत यांच्या माध्यमातून प्रशासनाच्या संपर्कात होतो. अखेर प्रत्यक्ष युद्धभूमीवरून माझ्या मुलीसह इतर विद्यार्थ्यांना भारतात आणल्याबद्दल प्रशासनाचे आभार.

- दीपक सावंत, वडील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपप्रवेश; निकालानंतर १८ दिवसात असं काय घडलं?

Grahan 2026 in India: यंदा भारतात कोणकोणती ग्रहणे दिसतील? सुतक वेळ आणि १२ राशींवरील परिणाम जाणून घ्या एका क्लिकवर

LinkedIn: लिंक्डइनच्या धक्कादायक अहवालाने भारतभर खळबळ; ८४% प्रोफेशनल्स ‘वेट अँड वॉच’ मोडमध्ये, नोकरी शोधापासून दूर राहत करियरला ब्रेक

Organ Donate : छपन्न वर्षांच्या हृदयाची चिमुकलीत धडधडली स्पंदने; अवयवदानामुळे त्या मृत्यूनंतरही जिवंत राहिल्या

Latest Maharashtra News Updates Live: हिंगोलीच्या औंढा शहरात गटविकास अधिकाऱ्याची गाढवावरून प्रतिकात्मक धिंड

SCROLL FOR NEXT