भास्कर जाधवांचे फार मनावर घेऊ नका : सदानंद चव्हाणांचे टिकास्त्र sakal
कोकण

भास्कर जाधवांचे फार मनावर घेऊ नका : सदानंद चव्हाणांचे टिकास्त्र

सकाळ वृत्तसेवा

चिपळूण (रत्नागिरी) : शिवसेनाप्रमुखांच्या विचारांत किती जोश आणि ऊर्जा आहे, हे तुम्ही आज दाखवून दिले आहे. शेतीची कामे सोडून कोणतीही निवडणूक नसताना तुम्ही सारे एकजुटीने येथे आलात. तुमच्यामधील जोश, उत्साह आणि ऊर्जा हीच शिवसेनाप्रमुखांच्या विचारांची ताकद आणि शक्ती आहे. आपल्या मतदारसंघात कोणी आले, काही बोलले तरी त्यांचे फार मनावर घेऊ नका, असे सांगून माजी आमदार सदानंद चव्हाण (Sadanand Chavan) यांनी आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना बेदखल केले.

माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या प्रयत्नाने चिपळूण-संगमेश्वर मतदार संघातील कोकरे विभागातील गावामध्ये विकासकामे मंजूर झाली असून, त्याचे भूमिपूजन करण्यात आले. डेरवण, दुर्गवाडी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेला कुटरे बादेकोंड रस्ता कुशिवडे, असुर्डे मांडकी आदी गावातील विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. या वेळी गावागावांत भगवेमय वातावरण निर्माण झाले होते. या निमित्ताने सदानंद चव्हाण यांची सावर्डे येथून मिरवणूक काढून स्वागत केले. डेरवण येथे तर ढोल-ताशा आणि फटाक्यांच्या जोरदार आतषबाजीत शिवसैनिकांच्या गर्दीत दणक्यात स्वागत झाले. या विभागातील डेरवण आणि कुटरे आंग्रेवाडी येथे जाहीर सभा घेण्यात आली. डेरवण येथे नळपाणी योजना भूमिपूजन आणि कुटरे येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याचे भूमिपूजन करून कामाला सुरवातही झाली. कित्येक वर्षाची मागणी चव्हाण यांनी पूर्ण केल्याने त्यांचा जाहीर सत्कार केला.

७२ हजार मते शिवसेनेची;दाखवून दिले..

सदानंद चव्हाण म्हणाले, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची ताकद फार मोठी आहे. याच विचाराने शिवसेना आणि शिवसैनिक आज मजबुतीने उभा आहे. निवडणुकीत हार-जीत होत असते; मात्र त्यामध्ये आपण ७२ हजार मते शिवसेनेची आहेत, हे दाखवून दिले. याच मताच्या जोरावर आगामी काळात चिपळूण मतदारसंघात शिवसेनेचा भगवा पुन्हा फडकवणारच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: ''पोरांनो, चला घरी! सोनम, खूप झालं भावा.. आता विषय वाढवू नको!'', सलमानने वांगचुक यांना दिली खास ऑफर

Sachin Tendulkar on Student Protest: "माझे वडील प्राध्यापक होते..."; सचिन तेंडुलकरची विद्यार्थ्यांसाठी भावनिक पोस्ट; म्हणाला, जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळत नाही...

Krishna River Project: कृष्णा नदीचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला शासनाची प्रशासकीय मान्यता; रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश

IND vs ZIM 1st T20I: वैभव सूर्यवंशीचा विश्वविक्रम, पण नाही मिळाला 'मॅन ऑफ दी मॅच' पुरस्कार; श्रेयस अय्यर काय म्हणाला वाचा...

Birth Certificate Name Change Ban : जन्म-मृत्यू दाखल्यातील पूर्ण नावबदलाला मज्जाव; फक्त मात्रा, स्पेलिंग दुरुस्तीला परवानगी

SCROLL FOR NEXT