Sadavali Gaurav Dhamane 14th in the country in Brain Development Examination education marathi news 
कोकण

कौतुकच : तिसरीत शिकणार्‍या स्पंदनने बुद्धिमत्तेच्या जोरावर आणले यश खेचून

प्रमोद हर्डीकर

साडवली (रत्नागिरी) :  ब्रेन डेव्हलपमेंट परीक्षेत देशात 14 वा आलेल्या आणि कथक, जिम्नॅस्टिक, बॅडमिंटनमध्ये राज्यस्तरापर्यंत चमक दाखवणार्‍या देवरूखच्या स्पंदनने जनरल नॉलेज ऑलिम्पियाड मध्येही जगात चौथा क्रमांक पटकावला आहे. तिसरीत शिकणार्‍या स्पंदन गौरव धामणे याने आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर साडवलीच्या पी.एस.बने स्कूलसह देवरूखचे नाव उंचावले आहे.


सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशनतर्फे आंतरराष्ट्रीय जनरल नॉलेज ऑलिम्पियाड झाली. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पंदनने चमक दाखवली. ४० गुणांच्या या ऑनलाईन परीक्षेत स्पंदनने ३९गुण मिळवले. सर्व विषयांवर आधारित ही परीक्षा होती. 
याबाबत बोलताना वडील डॉ. गौरव धामणे व आई शर्वरी धामणे यांनी सांगितले की, स्पंदन लहानपणापासून विविध स्पर्धांमध्ये भाग घेतो. चिकाटीने त्यात उतरून यशही मिळवतो. 

आमच्या दोघांचे सहकार्य त्यासाठी असते. लहान वयात त्याची ही मेहनत वाखाणण्याजोगी आहे. यापूर्वीही त्याने डान्स इंडिया डान्स या स्पर्धेत चमक दाखवली होती. विविध स्तरावर त्याने पारितोषिके मिळवली आहेत.सध्या साडवली येथील पी. एस. बने या इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता तिसरीमध्ये स्पंदन शिकत आहे. त्याच्या या यशाबद्दल माजी राज्यमंत्री रवींद्र माने, माजी आ. सुभाष बने, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, सुरेश बने,सुखदेव जाधव,शाळेतील मार्गदर्शक शिक्षक यांनी अभिनंदन केले. स्पंदनला पुढील कारकिर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

कल ओळखून शिक्षण
मुलांच्या पाठिशी पालक म्हणून भक्कमपणे उभे राहणे आवश्यक आहे. पाल्याकडून अमर्याद अपेक्षा करण्यापेक्षा त्याच्या कलानुसार त्याला शिक्षण दिल्यास तो नक्कीच यशस्वी होतो, अशी प्रतिक्रिया वडील गौरव धामणे यांनी दिली.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT