said uday samant bal mane enter in your political party in ratnagiri 
कोकण

'पक्षाची संपूर्ण ताकद मागे उभी करू ; बाळ माने यांनी शिवसेनेत यावे'

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : भाजपचे माजी आमदार बाळ माने सुसंस्कृत नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी कधी मारामारी केली नाही. अनेकदा मी त्यांचा सल्ला ऐकला आहे; मात्र पक्षात सध्या त्यांचा निवडणुकीपुरता वापर केला जात आहे. त्यांची घुसमट आम्ही समजू शकतो. त्यामुळे त्यांनी आमच्यासोबत यावे, पक्षाची संपूर्ण ताकद त्यांच्यामागे उभी करू. त्यांचे नेतृत्व स्वीकारायला आम्ही तयार आहोत, अशा शब्दात बाळ माने यांना शिवसेनेत येण्याचे खुले निमंत्रण उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिले. 

गोळप येथील प्रचार सभेतील या आवतणाने राजकीय वातावरण ढवळून निघाले. ग्रामपंचायत निवडणुकीवरून या दोघांत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवण्यासाठीची शिवसेना विरुद्ध भाजप अशीच लढत सुरू आहे. मात्र, या सर्व राजकीय घडामोडीमध्ये भाजपचे माजी आमदार बाळ माने पुन्हा प्रवाहात आले. तेव्हा त्यांनी ‘मंत्री सामंत आणि पालकमंत्री यांच्या विरोधात ग्रामीण भागात प्रचंड नाराजी आहे. त्या नाराजांच्या मागे मी उभा राहणार आहे. जुने-नवे वाद उफाळल्याने त्याचा फायदा भाजपला नक्की ग्रामपंचायत निवडणुकीत मिळेल,’ असे सांगितले.

याला उत्तर देताना उदय सामंत म्हणाले, ‘‘बाळ माने माझे चांगले मित्र आहेत. अनेक वेळा मी त्यांचा सल्ला घेतला आहे. तालुक्‍यात आणि जिल्ह्यात बाळ माने यांना मानणारे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. ते सुद्धा आम्हाला नेहमी सहकार्य करतात. त्यामुळे १८ तारखेला नेमके काय चित्र ते स्पष्ट होईल.’’ त्यात सामंत यांनी बाळ माने यांना थेट सेनेत येण्याचे आवताण दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सामंत म्हणाले, ‘‘बाळ मानेंना बाजूला करण्यासाठी अनेक षड्‌यंत्र केली जात आहेत. त्यामुळे त्यांची घुसमट आम्ही समजू शकतो. पक्षांतर्गत विरोधकांसोबत राहण्यापेक्षा त्यांनी आमच्यासोबत यावे, संपूर्ण पक्षाची ताकद त्यांच्यामागे उभा करू.’’ सामंत यांनी ऐन ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांच्या पायात साप सोडल्याने राजकीय वातावरणात गंमत आली आहे.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: मोदी सरकारमधील कोणत्या मंत्र्याने सर्वात वाईट कामगिरी केली? ५ मंत्र्यांची यादी तयार; खुद्द पंतप्रधानांनीच घेतली बैठक

शुभमन गिलचा IPL 2026 मधील बेस्ट कॅच... शिवम दुबेला माघारी पाठवून फिरवली मॅच Video Viral

Latest Marathi News Live Update : फोंडा घाटातून वाहतुकीवरील निर्बंध दहा जूनपर्यंत कायम

आधी घर आणि आता अलिशान गाडी! महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याने खरेदी केली नवी कोरी कार, किंमत ऐकून थक्क व्हाल

Solapur OBC Hostel News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! वसतिगृह प्रवेश नियमित, ५१०० रुपये निर्वाह भत्ता मंजूर, आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

SCROLL FOR NEXT