Sales of vegetables directly to the housing society in ratnagri kokan marathi news 
कोकण

शेतक-यांनो तुम्हाला भाजी विकायची आहे तर येथे साधा संर्पक...

सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी  : शेतकरी गट, कंपन्या आणि वैयक्तिक शेतकरी यांच्या माध्यमातून जिल्ह्यात गृहनिर्माण संस्थांमध्ये भाजीपाल्याची थेट विक्री करण्यात येणार आहे. कोरोनामुळे सोशल डिस्टन्सींग ठेवण्यासाठी आणि बाजारातील गर्दी नियंत्रीत करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनो विषाणुचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. रत्नागिरी जिल्हयात गृहनिर्माण संस्थांमधील सभासदांना घर बसल्या जीवनावश्यक भाजीपाल्याची गैरसोय होवू नये, यासाठी उत्पादक शेतकरी गट, शेतकरी कंपन्या, वैयक्तीक शेतकरी यांच्याकडून थेट विक्रीबाबत योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था डॉ. अशोक गार्डी, बाजार समितीचे अध्यक्ष संजय आयरे, सचिव किरण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी शेतक-यांकडुन भाजीपाला थेट विक्रीबाबत योजना राबवली जात आहे.त्यांच्या संस्थेची पुरेशा प्रमाणात एकत्रितरित्या मागणी नोंदवण्यासाठी रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समितीकडे संपर्क साधावयाचा आहे.

येथे साधा संर्पक

सहकारी गृहनिर्माण संस्थांमधील सभासद व शेतकरी, उत्पादक शेतकरी गट, शेतकरी कंपन्यात सहकार विभाग समन्वयाची भुमिका बजावणार आहे. त्यासाठी जिल्हयातील सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांचे अध्यक्ष  व सचिव यांना समन्वयक म्हणुन घोषित करणेत येत असुन त्यांनी सोसायटींमधील सभासदांना आवश्यक भाजीपाला मागणीबाबत समन्वय साधायचा आहे. गृहनिर्माण संस्थेने भाजीपाल्याची एकत्रित मागणी  am_ratnagari@msamb.com किंवा ddr_rtg@rediffmail.com
 या ई-मेलवर अथवा किरण महाजन 942263683, संजय आयरे 7387606565 या क्रमांकावर नोंदवल्यास त्यांना सोसायटीचे संकुलातही पोहोच करण्याची व्यवस्था केली आहे.

या कामासाठी सहकार विभाग व बाजार समितीचे अधिकारी, कर्मचारी यांनी आपापल्या तालुकानिहाय गृहनिर्माण संस्थांमधुन नागरीकांना त्यांच्या सोसायटीच्या एकत्रित मागणीनुसार जीवनावश्यक भाजीपाला पुरवठा सुरळीत होत राहील याकडे लक्ष द्यावयाचे आहे. त्यात हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक डॉ. अशोक गार्डी यांनी केले आहे.

अशी होईल कार्यवाही

ही मागणी नोंदविताना संस्थेचे नाव, पत्ता, संस्थेचे समन्वयक अध्यक्ष व सचिव यांचे नाव व आवश्यक भाजीपाला यांचे तपशिल याची माहीती दयावी. मागणी नोंदविल्यानंतर सहकार विभागाचे व बाजार समितीचे अधिकारी-कर्मचारी संबंधित शेतकरी व कंपनी यांना संपर्क साधतील आणि त्यानुसार सहकारी गृहनिर्माण संस्थेला घर पोच भाजीपाला पुरवठा होण्याबाबत कार्यवाही करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT