same rate as for exported fish ten years ago 
कोकण

निर्यातीच्या मासळीला दहा वर्षांपूर्वीचाच दर ; दलालांसोबत संघर्ष पेटणार

सकाळ वृत्तसेवा

दाभोळ : दापोली तालुक्‍यातील हर्णै बंदरात दलालांकडून मच्छीचे दर पाडून खरेदी केली जात असल्याने स्थानिक मच्छीमारांमध्ये असंतोष निर्माण झाला असून मच्छीमार व दलाल यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्‍यता आहे. निर्यात होणाऱ्या माशांनाही दहा वर्षांपूर्वीचा दर दिला जात आहे.

डिझेलचे वाढलेले भाव, मासेमारी बोटींवर काम करण्यास खलाशी मिळत नाहीत. तसेच अनेक वेळा येणारे वादळ यामुळे हर्णै परिसरातील मच्छीमारांवर उपासमारीचे संकट ओढवले आहे. जेव्हा समुद्रातील वातावरण शांत असते, तेव्हाच हे मच्छीमार समुद्रात मासेमारीसाठी जात असून त्यांनी मारुन आणलेल्या माशांना सध्या भावच मिळत नाही. लॉकडाउनमुळे बाजारात मंदी असल्याचे कारण दाखवून दलालांकडून मासळीला दर दिला जात नाही. निर्यात करणारे व्यापारी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत माशांना मागणीच नसल्याचे सांगून कमी भावात मासे खरेदी करतात, अशी हर्णै बंदरात मच्छीमारांची कैफियत आहे. सुरमई, पापलेट, टायनी, रिबन फिशी आदी निर्यात होणाऱ्या माशांना १० वर्षांपूर्वीचा दर दिला जात असल्याने मच्छीमार मेटाकुटीस आले आहेत. जागतिक बाजारपेठेत मालाला उठाव नाही, तर मग हे दलाल कशासाठी मोठ्या प्रमाणात मच्छीची खरेदी करतात असा सवाल आता बंदरात विचारला जात आहे. पुरेशी मागणी असतानाही कोरोनाचे कारण सांगून लूट केली जाते ती फार काळ हे आम्ही सहन करणार नाही, असा इशाराही मच्छीमार बांधवांनी दिला आहे. 

मच्छीमारांची अवस्था आता शेतकऱ्यांसारखीच झाली असून शेतकऱ्यांना जसा त्यांनी पिकविलेल्या धान्याचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही, तसेच मच्छीमारांना मारुन आणलेल्या मच्छीचा भाव ठरविण्याचा अधिकार नाही. इतर देशात हर्णैतील मासे निर्यात केले जातात, तर वाजवी भावात आमच्याकडून खरेदी का केली जात नाही? आम्हाला कमी किंमत का दिली जाते? आता शासनाने माशांचेही हमी भाव ठरवून दिले पाहिजेत.
- पांडुरंग पावसे, पाजपंढरी

विशेष तपशील...
- हर्णै बंदरात मच्छीमारांची कैफियत
- कमी भावातच मासे खरेदी 
- सुरमई, पापलेट, टायनीला दर पाडून
- कोरोनाचे कारण सांगून लूट

संपादन - धनाजी सुर्वे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT