Delta Plus
Delta Plus Delta Plus
कोकण

'तो' डेल्टा प्लसच ; अधिकृत माहितीची प्रतीक्षा

राजेश कळंबटे/

रत्नागिरी : जिल्ह्यात डेल्टा प्लस (Delta Plus)व्हेरिएंटचे रुग्ण आढळून आल्याचे शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, आपल्याकडे अधिकृत माहिती आलेली नाही. मात्र प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. संगमेश्वर (Sangameshwar)येथील आणखी दोन गावे कोरोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा (Collector Laxminarayan Mishra)यांनी दिली. (sangameshwar-141-positive-patients-delta-plus-symptoms-continue-to-be-investigated-in-ratnagiri-kokan-news)

जिल्हाधिकारी मिश्रा म्हणाले, दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात डेल्टा प्लस नाही असे जाहीर केले होते. शासनाकडून आलेल्या पत्रानुसार तो व्हेरिअंट ऑफ कन्सर्स आणि व्हेरिअंट ऑफ इनव्हेस्टीगेशन असल्याचे नमुद केले होते. आजही तिच परिस्थिती आहे. मात्र शासनाने जिल्ह्यातील 9 रुग्ण डेल्टा प्लस असल्याचे जाहीर केले. आपल्याकडे अधिकृत पत्र आलेले नाही. ते आल्यानंतर माहिती दिली जाईल.

संगमेश्‍वर तालुक्यातील पाच गावांमधील त्या लोकांमध्ये हा व्हेरिअंट सापडला आहे. तेथील लोकांचे नमुने प्रयोगशाळेत तपासण्यासाठी दिल्लीत पाठवले होते. त्यानंतर व्हीडीओ कॉन्फरन्स झाली होती. त्यांनी सुचवलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार उपाययोजना त्या पाच गावात राबविण्यास सुरवात केली आहे. तो भाग कोरोना प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. तेथील सर्व लोकांच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. आतापर्यंत 6 हजार 106 जणांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या असून 141 बाधित सापडले. त्यातील बहूतांश लोकांना कमी लक्षणे आहेत. बाधितांना विलगीकीकरणात ठेवून उपचार सुरु आहेत. बाधित सापडलेल्या लोकांच्या लसीकरणाची माहिती, त्यांना केव्हापासून लक्षणे दिसू लागली. ते कोणाच्या संपर्कात आल्यामुळे बाधित झाले याची माहिती एकत्रित करुन आयडीएसपी सेलला पाठवण्यात येत आहे. आयडीएसपीचे एक विशेष पथक मंगळवारी (ता. 22) दाखल झाले होते. त्यांच्याकडे 117 लोकांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. या नमुन्यांचे संशोधन झाल्यानंतर स्ट्रेनचा प्रकार कोणता, तो किती संसर्गजन्य आहे, सध्या कितीजणांमध्ये पसरला आहे हे सविस्तर समजणार आहे.

कोरोना चाचण्यांबरोबरच सारी आणि आयएलआयची तपासणी प्रतिबंधीत गावांमध्ये केली जात आहे. पाच गावांमध्ये आणखी गावे समाविष्ट झाली असून त्यांचे आदेश काढले जात आहेत. कोरोनाचा विषय संवेदनशील आहे. महाराष्ट्रात जळगाव, रत्नागिरी येथे डेल्टा प्लस असल्याचे प्रेसनोटमध्ये नमुन केले होते. मध्यप्रदेश, केरळमध्येही डेल्टा प्लस सापडला आहे. ही माहिती अधिकृत मिळाली आहे; मात्र तो किती संसर्गजन्य आहे याचे संशोधन सुरु आहे. रत्नागिरीत व्हेरिअंट आहे, हे निश्‍चित होते; मात्र तो डेल्टाप्लस आहे कींवा नाही हे शासनाकडून जाहीर केले जाते. त्याचे अधिकार जिल्हास्तरावर नाहीत.

हेही वाचा- 'रिफायनरी संदर्भात कोणतीही पक्षविरोधी भूमिका नाही'

13 जूनपासून प्रतिबंधित क्षेत्रातील त्या पाच भागातील मृतांचीही माहिती गोळा केली जात आहे. आतापर्यंत कंटेनमेंट झोन जाहीर करुन 10 दिवस झाले आहेत. प्रतिबंधित क्षेत्राचा निकष हा चौदा दिवसांचा असतो. त्यानुसार चार दिवसांनी त्या पाच गावातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय जाहीर केला जाईल. कोरोनाचे जाहीर केलेले निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय हा व्यापार्‍यांच्या म्हणण्यानुसार चालत नाही. तेथील रेकॉर्ड काय सांगते, त्यानुसार घेतला जातो. हे झोन जाणूनबुजून केलेले नाहीत. तेथील परिस्थितीनुसारच केले आहेत, असे जिल्हाधिकारी मिश्रा यांनी स्पष्ट बजावले.

टाळेबंदीमधील शिथिलता ही जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर आणि ऑक्सीजन बेडच्या संख्येवर अलवंबून आहे. सध्या जिल्ह्याचा दर 8 टक्केपर्यंत आला आहे. त्यामुळे लवकरात लवकर जिल्हा तिसर्‍या स्तरात जाईल. त्यानुसार शिथिलतेविषयी निर्णय घेतला जाईल, असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI IPL 2024 : लखनौनं मुंबईची कडवी झुंज काढली मोडून; गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT