Sanjay More Shivsenas candidate from Konkan Graduate Constituency has withdrawn his candidature  Esakal
कोकण

Graduate Constituency Election: आधी लोकसभा अन् आता पदवीधर...; भाजपसाठी शिंदे गटाचा मोठा त्याग; या जागेवरून अर्ज घेतला मागे

Graduate Constituency Election: कोकण पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे(शिंदे गट) उमेदवार संजय मोरे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून आता महायुतीकडून भाजपचे निरंजन डावखरे हे उमेदवार असणार आहेत.

अंकिता खाणे (Ankita Khane)

लोकसभा झाल्यानंतर आता लगेच विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये कुरबुरी होत असल्याच चित्र आहे. अशातच कोकण पदवीधर मतदारसंघातील शिवसेनेचे(शिंदे गट) उमेदवार संजय मोरे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. कोकण पदवीधर मतदारसंघातून आता महायुतीकडून भाजपचे निरंजन डावखरे हे उमेदवार असणार आहेत.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार रिक्त जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. 26 जून रोजी मतदान होणार आहे. तर आज (12 जून) उमेदवार अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान आज कोकणातून शिवसेनेने माघार घेत ती जागा भाजपला दिली आहे.

कोकण पदवीधर निवडणुकीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाची माघार

कोकण पदवीधर निवडणुकीतून शिवसेना उद्धव ठाकरे गटाने माघार घेतली आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना आज याबाबतची माहिती दिली आहे. कोकण पदवीधर निवडणूक महाविकास आघाडी तर्फे काँग्रेस लढवणार असल्याची माहितीही राऊत यांनी बोलताना दिली आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार

कोकण पदवीधर मतदारसंघ

निरंजन डावखरे (भाजप)

किशोर जैन (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) - अर्ज माघारी घेणार असल्याची माहिती

रमेश कीर (काँग्रेस)

संजय मोरे (शिवसेना) - माघार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara Retire: भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' निवृत्त! पुजाराने केली मोठी घोषणा; म्हणाला, 'प्रत्येक चांगली गोष्ट...'

Latest Marathi News Updates : सांगोला तालुक्यात लांडग्यांचा कहर!

'जर कोणी माझ्यासाठी या दोन गोष्टी केल्या, तर मी आयुष्यात कधीच दक्षिणा घेणार नाही'; बागेश्वर बाबांचे मोठे विधान

Viral Video : महिलेने वाचविलेला जीव, अनेक वर्षांनी दिसताच सिंहांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Thalapathy Vijay चा मेगा ब्लॉकबस्टर शो! Modi च्या सभेपेक्षा जास्त गर्दी, पडद्यावरून थेट मैदानात कसा आला?

SCROLL FOR NEXT