कोकण

सावंतवाडीत नवविवाहितेची आत्महत्या; पतीसह सासरच्यांवर तक्रार

सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी: येथील सबनिसवाड्यात (Sabniswada) राहत्या फ्लॅटमध्ये पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत एका नवविवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली. निधी नीलेश पास्ते (वय २९), असे तिचे नाव आहे. ही घटना काल रात्री उशीरा समोर आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या आत्महत्येला तिचा पती व सासरचे जबाबदार असल्याची तक्रार मुलीचे वडील प्रभाकर बापू माळकर (वय ५५, रा. कारिवडे पेडवेवाडी) यांनी येथील पोलिसांत दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार

सबनिसवाडा परिसरातील तुळजा आर्केट बिल्डिंगमध्ये निधी व तिचा पती निलेश हे दोघेही राहत होते. आठवडा बाजार असल्यामुळे सायंकाळच्या सुमारास पती बाजार आणण्यासाठी गेला होता. यावेळी घरात कुणी नसल्याचे पाहून विवाहितेने गळफास लावून घेतला. निलेश घरी आल्यानंतर त्यांना आतून घराचा दरवाजा बंद दिसला. त्याने उघडण्याचा प्रयत्न केला. पत्नीला फोन करण्याचा प्रयत्न केला; परंतु कोणताही प्रतिसाद आला नाही. अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने त्यांनी घरात प्रवेश केला. यावेळी पत्नी गळफास लावलेल्या स्थितीत आढळली. मृत निधी या कलंबिस्त पास्तेवाडी येथील असून तिचे पूर्वाश्रमीचे नाव प्रिया प्रभाकर माळकर, असे आहे. तिचा २०१८ मध्ये विवाह झाला होता. त्यानंतर सध्या ती सबनिसवाडा सावंतवाडी येथे राहत होती.

सबनिसवाडा परिसरातील तुळजा आर्केट बिल्डिंगमध्ये निधी व तिचा पती निलेश हे दोघेही राहत होते.

याप्रकरणी माळकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, पती निलेश ज्ञानेश्वर पास्ते (रा.सबनीसवाडा तुळजा आर्केट), सासरे ज्ञानेश्वर पांडुरंग पास्ते व निर्मला पास्ते यांच्याविरोधात क्रूर वागणूक, मानसिक छळ, मारहाण, शिविगाळ करून ठार मारण्याची धमकी तसेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयितांच्या अटकेसाठी या कारिवडेवासीयांनी येथील पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. पोलीस उपनिरीक्षक जयराम पाटील अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

रशियाचा मोठा निर्णय! १ एप्रिलपासून कोणत्याच देशाला विकणार नाही पेट्रोल; जगात उडाली खळबळ, काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT